पुण्याची गोष्ट : देशातील सर्वाधिक लांब उड्डाणपूल पुण्याला जोडणार, वाहतूक कोंडी सुटणार
Pune News : पुणे शहर आणि शिरूर हे एकमेकांना जोडले जाणार आहेत. या मार्गाचा विस्तार होण्यासाठी सहा संबंधित रस्त्याचे पदरीकरण केले जाणार आहेत. याच प्रकल्पाची देशातील सर्वाधिक लांब असणारा उन्नत मार्ग अशी ओळख आहे. शहरातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या मार्गांपैकी हा एक महत्त्वाचा महामार्ग ठरणार आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पुणे-शिरूर मार्गाचा विस्तार होणार
जाणून घ्या महामार्गाविषयी
पुण्याची गोष्ट : पुणे शहर आणि शिरूर हे एकमेकांना जोडले जाणार आहेत. या मार्गाचा विस्तार होण्यासाठी सहा संबंधित रस्त्याचे पदरीकरण केले जाणार आहेत. याच प्रकल्पाची देशातील सर्वाधिक लांब असणारा उन्नत मार्ग अशी ओळख आहे. शहरातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या मार्गांपैकी हा एक महत्त्वाचा महामार्ग ठरणार आहे. अशातच, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातील प्रवाशांना या मार्गाचा मोठा फायदा होईल.
हे ही वाचा : मोठी बातमी... आदित्य ठाकरेंनी CM फडणवीसांना मध्यरात्री केला फोन, कोणाची काढली विकेट?
असा असेल महामार्ग
राज्य सरकारने पुणे-शिरूर मार्गाच्या विस्ताराला राज्य सरकारने हिरवा कंदील दर्शवला आहे. हा संपूर्ण महामार्ग 35.12 किमी लांबीचा असणार आहे. याच मार्गाचं सहा पदरी महामार्गात रुपांतर होणार आहे, याचदरम्यान पुणे-शिरूर प्रवासासाठी केवळ 45 मिनिटांचा अवधी लागेल. याच ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या वाहन चालक, अवजड वाहनं आणि कर्मचाऱ्यांचा प्रवास सुलभ होणार आहे. या संपूर्ण मार्ग 53.4 किमी लांब असून यापैकी 35 किमी भाग उन्नत असेल. या संपूर्ण प्रोजेक्टसाठी अंदाजे 7 हजार 300 रुपयांचा खर्च लागू शकतो.
वाहतूक कोंडी सुटणार
पुणे-शिरूर मार्ग, पुणे-अहिल्यानगर NH 753F महामार्गाचा भाग आहे. याचमुळे मार्गाच्या विकासामुळे छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातील अंतर कमी होणार आहे. अशातच समृद्धी महामार्गालाही थेट जोडणारा मार्ग तयार होणार आहे. खराडी, वाघोली, लोणीकांड, शिक्रापूर आणि शिरूर परिसरात मार्गावरील कोंडी फुटणार आहे.
हे ही वाचा : सोलापूर : रीलस्टार विवाहिता स्वत:च्या हॉटेलच्या स्वयंपाकघरात गेली, अन् सर्वांची झोप उडाली
हा मार्ग तयार होण्यासाठी 4 वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. हा महामार्ग पश्चिम आणि पूर्व महाराष्ट्राला जोडला जाणार आहे. अशातच पुण्याहून मराठवाड्यातील प्रवास आता सुलभ होईल.









