मोठी बातमी... आदित्य ठाकरेंनी CM फडणवीसांना मध्यरात्री केला फोन, कोणाची काढली विकेट?

मुंबई तक

Mumbai Mahapalika Politics : मुंबई महानगरपालिकेत आदित्य ठाकरे यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे सेव्हनहिल्स रुग्णालयाचे खासगीकरण आणि इतर चार वादग्रस्त प्रस्ताव प्रशासनाकडे फेरविचारासाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रस्तावांच्या विरोधात मातोश्रीवरून थेट देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Mahapalika Politics
Mumbai Mahapalika Politics
google news

बातम्या हायलाइट

point

'मातोश्री'वरुन फडणवीसांना फोन

point

मुंबई महापालिकेत शिंदेसेनेवर कुरघोडी; काय घडलं?

Mumbai Mahapalika Politics : मुंबई महानगरपालिकेच्या राजकारण सध्या मोठी राजकीय उलथापालथ सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. आमदार आदित्य ठाकरे यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे सुधार समितीतील 4 महत्त्वाचे प्रस्ताव प्रशासनाकडे फेरविचारासाठी परत पाठवण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने सेव्हनहिल्स रुग्णालयाचे खाजगीकरण, पाच उपनगरीय रुग्णालयांतील रक्तपेढ्यांचा पीपीपी (PPP) प्रस्ताव, वांद्रे रेक्लमेशन येथील एक्झिबिशन सेंटर आणि मलबार हिलमधील ग्रीन झोन बदलाच्या प्रस्तावांचा समावेश आहे. 

हेही वाचा : कुटुंबातील सगळे घरातच होते, IPS अधिकाऱ्याची मुलगी दुसऱ्या रुममध्ये गेली अन्

हे सर्व प्रस्ताव मुंबईच्या जमिनी बळकावण्यासाठी सत्ताधारी शिंदे सेनेने आणले असल्याचा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. त्यांच्या या आरोपांमुळे महापालिकेतील सत्ताधारी गटाची कोंडी झाली होती.

मातोश्रीवरुन फडणवीसांना कॉल, अन् शिंदे सेनेवर कुरघोडी 

आदित्य ठाकरे यांनी या प्रस्तावांविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर राजकीय समीकरणांनी अचानक वेग घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काल रात्री मातोश्रीवरून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करण्यात आला होता. आमदार मिलिंद नार्वेकर यांनी या प्रस्तावांमधील त्रुटींची सविस्तर माहिती देण्यासाठी फडणवीसांशी मध्यरात्री संपर्क साधला. या संवादानंतर देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ भाजपच्या नगरसेवकांकडून या प्रस्तावांचा सविस्तर अहवाल मागवून घेतला आणि हे प्रस्ताव सध्या मंजूर करू नका, अशा स्पष्ट सूचना दिल्या. यामुळे तूर्तास सत्ताधारी आणि विरोधकांमधील मोठा संघर्ष टाळला गेला असला तरी, या घटनेमुळे शिंदे गटाला मात्र मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे.

हे वाचलं का?