केतनच्या हत्येपूर्वी सिया आणि चेतनने गुगलवर जे शोधलं ते ऐकून हादरून जाल
lohgad murder case : लोहगड हत्या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर आली असून, आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी केतन अग्रवालला विष देऊन मारण्याचाही कट रचल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
ADVERTISEMENT
Lohgad murder case : पुण्यातील लोहगड हत्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. केतन अग्रवालला लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलून देणारी आरोपी सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांनी सुरुवातीला त्याला विष देऊन ठार मारण्याचा कट रचल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून समोर आली आहे. या दोघांनी केतनचा काटा काढण्यासाठी विविध पर्यायांचा विचार केला होता. त्यासाठी त्यांनी इंटरनेटवर विषाशी संबंधित माहिती शोधल्याचे तपासात उघड झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या प्रकरणात पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर डिजिटल उपकरणांच्या फॉरेन्सिक तपासणीत महत्त्वाचे डिजिटल पुरावे समोर आल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा : माहीम : धक्का लागल्याने चाकू हल्ला, माफी मागूनही विषय मिटला नाही; स्थानकाबाहेर काय घडलं?
सर्च हिस्ट्रीमध्ये पोलिसांना काय आढळलं?
तपासादरम्यान आरोपींच्या सर्च हिस्ट्रीमध्ये कोणते विष सहज उपलब्ध होऊ शकते, विषाचा परिणाम किती वेळात होतो आणि ते कशा प्रकारे देता येऊ शकते, यासंबंधी इंटरनेटवर शोध घेतल्याचे पुरावे आढळल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. हे डिजिटल पुरावे पुढील सुनावणीदरम्यान न्यायालयात सादर केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विष देऊन केतनचा मृत्यू झाल्यानंतर कोणालाही संशय येणार नाही, याची खबरदारी घेण्याचाही आरोपींचा विचार होता. मात्र त्यानंतर त्यांनी वेगळी योजना आखत केतनला लोहगड किल्ल्यावर नेल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा : 'अपघाताची केस मर्डरची कशी झाली?' सियाचे वकील कोर्टात कोणता युक्तीवाद करणार?









