सिंहगडावर राडा, धक्का लागला म्हणून हाणामारी.. हादरवून टाकणारा VIDEO
Sinhagad Fort Viral Video : पुण्यातील सिंहगडावर रविवारी तरुणांच्या दोन गटांत तुफान हाणामारी झाली. धक्का लागल्याच्या कारणावरून सुरू झालेल्या वादानंतर लाठ्या-काठ्या, दगड आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सिंहगडावर राडा, धक्का लागला म्हणून हाणामारी..
हादरवून टाकणारा VIDEO
Sinhagad Fort Viral Video : पुण्यातील सिंहगडावर तरुणांच्या दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने सिंहगडावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. याच गर्दीत धक्का लागल्याच्या कारणावरून काही तरुणांमध्ये वाद सुरू झाला. सुरुवातीला झालेला हा वाद काही वेळातच वाढला आणि तरुणांच्या दोन गटांमध्ये मारामारी सुरू झाली.
हेही वाचा : 4 राज्ये, 250 सीसीटीव्ही अन् 7 हजार किमीचा पाठलाग...गर्लफ्रेंडला संपवणाऱ्या तरुणाला कसं पकडलं?
दोन गटात तुफान हाणामारी, सिंहगडावर काय घडलं?
वाद वाढल्यानंतर सिंहगडावरच तरुणांनी एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या हाणामारीत लाठ्या-काठ्या, दगड तसेच लाथा-बुक्क्यांचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे काही काळ सिंहगडावरील वातावरणात तणाव निर्माण झाला. तरुणांच्या दोन गटांमध्ये झालेल्या या हाणामारीचा प्रकार उपस्थितांच्या निदर्शनास आला.
हेही वाचा : 'हा माझा मुलगा नाही...' चिमुकल्याला खांबावर आपटून मारले, नराधम बापाचं कृत्य
