4 राज्ये, 250 सीसीटीव्ही अन् 7 हजार किमीचा पाठलाग...गर्लफ्रेंडला संपवणाऱ्या तरुणाला कसं पकडलं?
राजस्थानमधील भिवडी येथून हत्येची एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. एका तरुणीच्या हत्येचे गूढ उलगडण्यासाठी पोलिसांना 250 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि विविध राज्यांमधील 325 ठिकाणांवर पाळत ठेवावी लागली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
4 राज्ये, 250 सीसीटीव्ही अन् 7 हजार किमीचा पाठलाग
गर्लफ्रेंडला संपवणाऱ्या तरुणाला कसं पकडलं?
Crime News : राजस्थानमधील भिवडी येथून हत्येची एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांना तब्बल 7 हजार किलोमीटरचा प्रवास करावा लागला. या तपासादरम्यान पोलिसांनी 250 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि विविध राज्यांमधील 325 ठिकाणांवर पाळत ठेवली. या घटनेची सुरुवात एका अज्ञात तरुणीचा मृतदेह सापडण्याने झाली. मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याने तिची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. अखेर खैरथल-तिजारा जिल्ह्यातील भिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या या मृतदेहाची ओळख पटली असून, तिचे नाव मुस्कान असल्याचे समोर आले.
मुस्कानचा मृतदेह सापडला अन्...
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मुस्कान जानेवारी 2026 पासून शाहबाज खान याच्या संपर्कात होती आणि संथलका येथील जग्गू कॉलनीत राहत होती. 19 जूननंतर अचानक तिचा फोन बंद झाला, ज्यामुळे तिच्या कुटुंबाने तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. संथलका येथे जाऊन चौकशी केली असता शाहबाजने तिच्याबद्दल काहीही सांगण्यास नकार दिला. काही वेळेनंतर फुलबाग पोलीस ठाण्यातून कुटुंबीयांना एका तरुणीचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली. कुटुंबीयांनी रुग्णालयात जाऊन पाहणी केली असता तो मृतदेह मुस्कानचाच असल्याचे स्पष्ट झाले.
हे ही वाचा : पतीचा तिरस्कार अन् 'चमन'वर जीव जडला, 5 लाखांची डील अन् कोणाची झाली हत्या?
डोक्यात दगड घालून हत्या
तपासादरम्यान संशयाची सुई शाहबाजकडे वळल्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. मिळालेल्या माहितीनुसार, मुस्कानला भेटण्याच्या बहाण्याने रामपुराच्या टेकड्यांवर बोलावण्यात आले होते. तिथे तिच्या डोक्यात दगड घालून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्येनंतर ओळख पटू नये आणि पुरावे नष्ट व्हावेत या उद्देशाने तिचा मृतदेह जंगली प्राण्यांच्या गुहेसमोर फेकून देण्यात आला, जेणेकरून प्राण्यांनी तो खाऊन टाकावा. मात्र, आरोपीचा हा कट यशस्वी झाला नाही आणि पोलिसांना मृतदेह मिळून तिची ओळख पटली.
हे ही वाचा : रुग्णालयाच्या शौचालयात नर्सचा मृतदेह, नाईट ड्यूटीवर असताना काय घडलं?
चार राज्यांमध्ये तपास
या घटनेनंतर आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी एक मोठी मोहीम उघडली. तपासाची चक्रे राजस्थानमधून फिरत हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालपर्यंत पोहोचली. अनेक ठिकाणी पोलिसांनी वेशांतर करून माहिती गोळा केली. अखेर 7 हजार किलोमीटरचा पाठलाग केल्यानंतर मुख्य आरोपीला बिहारमधील सहरसा जिल्ह्यातून अटक करण्यात आली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या हत्येत आणखी एका व्यक्तीचा सहभाग असल्याचे समोर आले असून, पोलीस सध्या त्याची भूमिका तपासत आहेत आणि पुढील कारवाई करत आहेत.
