पतीचा तिरस्कार अन् 'चमन'वर जीव जडला, 5 लाखांची डील अन् कोणाची झाली हत्या?

मुंबई तक

Crime News : दिल्लीच्या संगम विहारमध्ये पती मुन्ना लाल यांच्या हत्येप्रकरणी पत्नी मंजू उर्फ नाजियासह तिघांना अटक करण्यात आली आहे. चोरीचा बनाव करून तपास भरकटवण्याचा प्रयत्न केल्याचा पोलिसांचा दावा आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

पतीचा तिरस्कार अन् 'चमन'वर जीव जडला

point

5 लाखांची डील अन् कोणाची झाली हत्या?

Delhi Crime News : दिल्लीतील संगम विहार परिसरातून पतीच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मंजू उर्फ नाजिया हिने कथित प्रियकर चमनसोबत मिळून पती मुन्ना लाल यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. हत्या केल्यानंतर या घटनेला चोरीदरम्यान घडलेल्या प्रकाराचे स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. 10 ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे 5 वाजून 15 मिनिटांनी एका अज्ञान व्यक्तीच्या जखमी अवस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस घटनास्थळी पोहोचले असता मुन्ना लाल मृतावस्थेत आढळले. त्यांच्या शरीरावर मारहाणीच्या अनेक खुणा होत्या. त्यावेळी पत्नीने घरात चोर घुसले होते आणि त्यांच्याशी झालेल्या वादात पतीचा मृत्यू झाल्याचे पोलिसांना सांगितले.

हेही वाचा : फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये रक्तरंजित कांड, बापाने पोटच्या मुलींना संपवले; नेमकं कारण काय?

मंजूने चमनसोबत मिळून रचला पतीच्या हत्येचा कट 

मात्र, मंजूने सांगितलेल्या चोरीच्या कथेबाबत पोलिसांना सुरुवातीपासूनच संशय होता. तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, स्थानिकांची चौकशी केली आणि फॉरेन्सिक पुराव्यांची पडताळणी सुरू केली. तपासादरम्यान घटनाक्रमातील काही बाबी चोरीच्या कथेशी जुळत नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे तपासाची दिशा पत्नीच्या कथित भूमिकेकडे वळली. पोलिसांच्या दाव्यानुसार, चौकशीत कथित कटाची माहिती समोर आली. मंजूने चमनसोबत मिळून पतीची हत्या करण्याची योजना आखली होती आणि त्यासाठी चमनला 5 लाख रुपये देण्याचे ठरल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हत्येपूर्वी चमनला 20 हजार रुपये आगाऊ देण्यात आले होते.

हेही वाचा : राहुल गांधींनी बोलावलं.. थेट मिठी मारली आणि नंतर.. सगळे हसत राहिले..