'अपघाताची केस मर्डरची कशी झाली?' सियाचे वकील कोर्टात कोणता युक्तीवाद करणार?

Sia Goyal lawyer reaction ketan Agarwal death case : केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात आरोपी सिया गोयलच्या वकिलांनी पोलिस कोठडी वाढवण्यास विरोध करत न्यायालयात मांडण्यात येणाऱ्या मुद्द्यांची माहिती दिली. तसेच कथित कबुलीजबाब आणि सीन रिक्रिएशनबाबतही त्यांनी भूमिका स्पष्ट केली.

ADVERTISEMENT

 Sia Goyal lawyer reaction ketan Agarwal death case
Sia Goyal lawyer reaction ketan Agarwal death case
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

अपघाताची केस मर्डरची कशी झाली?

point

सियाचे वकील कोर्टात कोणता युक्तीवाद करणार?

Sia Goyal lawyer reaction ketan Agarwal death case : केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात आरोपी सिया गोयलच्या वतीने न्यायालयात कोणत्या मुद्द्यांवर बाजू मांडली जाणार आहे, याबाबत तिच्या वकिलांनी प्रतिक्रिया दिली.  "सियाविरोधात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमधील आरोप तसेच आतापर्यंत झालेल्या तपासाच्या आधारेच न्यायालयात युक्तिवाद केला जाईल. तपासादरम्यान सियाने पूर्ण सहकार्य केले असून, पोलिसांना चौकशीसाठी पुरेसा वेळ देण्यात आला आहे." त्यामुळे आता आणखी पोलीस कोठडी देण्याचे कोणतेही औचित्य नसल्याचा युक्तिवाद न्यायालयात केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : वडिलांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर नोकरीची इच्छा, मुलाने थेट 10 लाखांची दिली सुपारी अन्...

'सियाला न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी करणार'

वकिलांनी पुढे सांगितले की, सियाकडून आवश्यक ती चौकशी करण्यासाठी पोलिसांना पुरेसा कालावधी मिळाला आहे. त्यामुळे यापुढे पोलिस कोठडी वाढवणे योग्य ठरणार नाही. याच आधारावर न्यायालयात सियाला न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सुरुवातीला अपघाती मृत्यू म्हणून नोंद झालेल्या प्रकरणाकडे नंतर हत्या म्हणून पाहण्यामागे तपास यंत्रणेकडे कोणते ठोस कारण आहे, हा मुद्दाही न्यायालयात उपस्थित केला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. बचाव पक्षाच्या मते, हे प्रकरण हत्या म्हणून चालवण्यासाठी सध्या तरी कोणतेही ठोस कारण दिसत नसल्याचा दावा त्यांनी केला.

हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात विजांसह पाऊस घालणार धिंगाणा, 'या' जिल्ह्यांवर आस्मानी संकट

'पोलिस कोठडीत दिलेली कबुली ग्राह्य पुरावा मानला जात नाही'

सिया आणि चेतन यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचा पोलिसांचा दावा विचारला असता, वकिलांनी त्यावरही भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, भारतीय साक्ष्य अधिनियमानुसार पोलिस कोठडीत असताना आरोपीने दिलेला कथित कबुलीजबाब हा ग्राह्य पुरावा मानला जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीत आरोपी दबावाखाली किंवा भीतीमुळे काहीही सांगू शकतो, त्यामुळे अशा कबुलीजबाबाला कायद्यानुसार पुराव्याचे मूल्य नसते, असे त्यांनी म्हटले. तपास अद्याप सुरू असून या प्रकरणात अद्याप आरोपपत्र दाखल झालेले नाही. त्यामुळे तपास यंत्रणा पुढे कोणते ठोस आणि पुष्टी करणारे पुरावे न्यायालयासमोर मांडते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

प्रकरणात सियाला घटनास्थळी नेऊन सीन रिक्रिएशन करण्यात आल्याबाबत विचारले असता, वकिलांनी सांगितले की, तपासादरम्यान एखाद्या घटनेची नेमकी घडामोड समजून घेण्यासाठी तपास यंत्रणा घटनास्थळी जाऊन सीन रिक्रिएशन करू शकते. त्या दिवशी नेमके काय घडले असावे किंवा कोणत्या शक्यता असू शकतात, याचा अंदाज घेण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते. मात्र, सीन रिक्रिएशनला स्वतंत्र आणि ठोस पुरावा म्हणून पाहता येत नाही. तपासादरम्यान उपलब्ध झालेल्या इतर पुराव्यांशी त्याची सांगड घालण्यासाठी ही प्रक्रिया उपयोगी ठरते, असे त्यांनी स्पष्ट केले.