माहीम : धक्का लागल्याने चाकू हल्ला, माफी मागूनही विषय मिटला नाही; स्थानकाबाहेर काय घडलं?
Mumbai mahim railway station knife attack : माहीम रेल्वे स्थानकाबाहेर किरकोळ धक्का लागल्याने झालेल्या वादातून 35 वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून शोधमोहीम सुरू केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
माहीम : धक्का लागल्याने चाकू हल्ला
माफी मागूनही विषय मिटला नाही; स्थानकाबाहेर काय घडलं?
Mumbai mahim railway station knife attack : मुंबई लोकलमधील 22 वर्षीय मयंक लोहारचे हत्या प्रकरण ताजे असतानाच, आता पुन्हा एका किरकोळ वादातून चाकूहल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी रात्री सुमारे 10.15 वाजण्याच्या सुमारास माहीम रेल्वे स्थानकाबाहेर नवीन प्रसन्ना (वय 35) यांच्यावर अज्ञात व्यक्तीने चाकूने वार करून गंभीर जखमी केले. या प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली असून, माहीम पोलिसांनी अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला आहे.
हेही वाचा : वडिलांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर नोकरीची इच्छा, मुलाने थेट 10 लाखांची दिली सुपारी अन्...
माफी मागूनही वाद मिटला नाही
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन प्रसन्ना हे लोअर परळ येथील एका जाहिरात, मनोरंजन आणि तंत्रज्ञान कंपनीत कार्यरत आहेत. ते लोकलने प्रवास करून घरी परतत होते. माहीम रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर फुटपाथवर चालत असताना त्यांचा एका पादचाऱ्याला धक्का लागला. त्यानंतर प्रसन्ना यांनी संबंधित व्यक्तीची माफीही मागितली. मात्र, धक्क्यामुळे आपला मोबाईल खाली पडून खराब झाल्याचा दावा करत आरोपीने प्रसन्ना यांच्याकडे भरपाईची मागणी केली. त्यांनी भरपाई देण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने संतापाच्या भरात चाकूने त्यांच्यावर वार केले.
हेही वाचा : 'अपघाताची केस मर्डरची कशी झाली?' सियाचे वकील कोर्टात कोणता युक्तीवाद करणार?









