राहुल गांधींचा संसद मार्ग पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या, कोणत्या मागणीसाठी झाले आक्रमक?
Rahul Gandhi sansad marg protest : काँग्रेस नेते राहुल गांधी जंतर-मंतरवरील CJP आंदोलनादरम्यान पॅलेट गनच्या वापरासंदर्भातील चौकशीची माहिती घेण्यासाठी दिल्लीतील संसद मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांकडून तातडीने निर्णय न झाल्याने राहुल गांधी पोलीस ठाण्याबाहेरच ठिय्या आंदोलन सुरु केलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राहुल गांधींचा संसद मार्ग पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या,
कोणत्या मागणीसाठी झाले आक्रमक?
Rahul Gandhi sansad marg protest : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही वेळापूर्वी दिल्लीतील संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरु केलंय. जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या आंदोलनादरम्यान पॅलेट गनचा वापर झाल्याच्या आरोपांशी संबंधित सुरू असलेल्या चौकशीची माहिती घेण्यासाठी ते डीसीपी कार्यालयात गेले होते. या प्रकरणातील तपास आतापर्यंत कुठपर्यंत पोहोचला आहे आणि पोलिसांकडून काय कारवाई करण्यात आली आहे, हे जाणून घेण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न होता.
हेही वाचा : मुंबई : नजर काढण्याच्या बहाण्याने घरात शिरला, बहुरुपी तृतीयपंथीयाचा महिलेवर लैंगिक अत्याचार
साहिल लोहबचला सोबत घेऊन राहुल गांधींचा ठिय्या
विशेष म्हणजे, पॅलेट गनच्या कथित वापरामुळे प्रभावित झालेल्या साहिल लोहबच यांनाही राहुल गांधी आपल्या सोबत घेऊन गेले होते. राहुल गांधी यांनी या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आलेली नसल्याचा आरोप केला असून, काही वेळातच ते माध्यमांशी संवाद साधणार असल्याचे सांगितले.
हेही वाचा : खासदारपुत्राच्या भरधाव कारने तरुणीला चिरडले, तरीही अटक नाहीच; नेमकं कारण काय?
