शाळेच्या पाहाणीसाठी गेलेल्या CJP च्या कार्यकर्त्यांना मारहाण, शाळेच्या बाहेर मोठा राडा
cjp workers were beaten up : जयपूरच्या रामपुरा-कंवरपुरा गावात सरकारी शाळेच्या पाहणीवरून CJP कार्यकर्त्यांना ग्रामीणांच्या विरोधाचा सामना करावा लागला. मारहाण, वाहनांची तोडफोड आणि दगडफेकीच्या आरोपांमुळे गावातील वातावरण तणावपूर्ण झाले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
शाळेची पाहाणी गेलेल्या CJP च्या कार्यकर्त्यांना मारहाण
शाळेच्या बाहेर मोठा राडा
cjp workers were beaten up : राजस्थानची राजधानी जयपूरमधील बगरू परिसरातील रामपुरा-कंवरपुरा गावात सरकारी शाळेच्या मुद्द्यावरून मोठा राडा झाला. कॉकरोच जनता पार्टीने (CJP) आपल्या ‘स्कूल ठीक करो’ अभियानांतर्गत गावातील सरकारी शाळेची पाहणी करण्यासाठी कार्यकर्त्यांना पाठवले होते. मात्र, गावकऱ्यांनी या कार्यकर्त्यांचा विरोध करत त्यांना मारहाण केलीये. त्यानंतर CJPचे प्रवक्ते आशुतोष रांका स्वतः शाळेत पोहोचले. त्यावेळी गावकऱ्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. काही वेळातच वातावरण तणावपूर्ण झाले आणि धक्काबुक्की सुरू झाली. आरोपानुसार, आशुतोष रांका यांच्यासह CJP कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली आणि त्यांना गावातून हाकलून देण्यात आले.
हेही वाचा : धनुष्यबाण चिन्ह गोठवलं तर, कोणाला फायदा? आंबेडकरांचं मोठं विधान
भाजपच्या गुंडांनी हल्ला केल्याचा आरोप
या घटनेदरम्यान CJP कार्यकर्त्यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आणि गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. कार्यकर्त्यांवर वाळू उडवण्यात आली तसेच दगडफेकही झाल्याचा आरोप आहे. CJPचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सोशल मीडियावर आरोप केला की, त्यांच्या टीमसोबत असलेल्या कार्यकर्त्यांवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. गावात आलेले लोक प्रत्यक्षात ग्रामीण नसून भाजपने बोलावलेले लोक असल्याचा आरोपही त्यांनी केला. या लोकांचा प्रमुख कमल प्रधान असून तो गरीबांच्या जमिनीवर कब्जा करण्याचे काम करतो, असा आरोप रांका यांनी केला. त्यांनी भाजपवर टीका करत, मुलांनी म्हशींच्या गोठ्यासारख्या ठिकाणी शिकत राहणे मान्य आहे; मात्र शाळा दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला तर ते मान्य नाही, असा आरोप केला. अभिजीत दिपके यांनीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर प्रतिक्रिया देताना आशुतोष यांच्यावर राजस्थानमध्ये भाजपच्या गुंडांनी हल्ला केल्याचा आणि राजस्थान पोलिसांनी ते होऊ दिल्याचा आरोप केला.
हेही वाचा : Personal Finance: एकापेक्षा जास्त Credit Cards ठेवणं चांगलं की धोकादायक?
