Personal Finance: एकापेक्षा जास्त Credit Cards ठेवणं चांगलं की धोकादायक?

रोहित गोळे

एकापेक्षा जास्त Credit Cards ठेवणं फायदेशीर आहे की आर्थिक नुकसान करू शकतं? जाणून घ्या Multiple Credit Cards चे फायदे, तोटे, Credit Score वर परिणाम आणि किती Credit Cards ठेवणं योग्य आहे.

ADVERTISEMENT

personal finance multiple credit cards benefits risks how many credit cards should you have
Personal Finance Tips
Google CTA

Personal Finance tips for Credit Cards: आजच्या काळात Credit Card हा केवळ खरेदीसाठी पैसे उधार घेण्याचा पर्याय राहिलेला नाही. Online Shopping, Travel, Dining, Fuel, Reward Points, Cashback अशा अनेक कारणांसाठी लोक वेगवेगळी Credit Cards घेतात. त्यामुळे अनेकांच्या Wallet मध्ये एक-दोन नव्हे तर तीन-चार Credit Cards असतात.

पण प्रश्न असा आहे की, एकापेक्षा जास्त Credit Cards ठेवणं खरंच फायदेशीर आहे का? की यामुळे आर्थिक शिस्त बिघडून कर्जाच्या जाळ्यात अडकण्याचा धोका वाढतो?

याचं उत्तर प्रत्येकासाठी वेगळं असू शकतं. कारण Credit Cards ची संख्या महत्त्वाची असली तरी त्यांचा वापर कसा केला जातो, हे त्याहून महत्त्वाचं आहे.

एकापेक्षा जास्त Credit Cards ठेवण्याचे फायदे

1. Credit Limit वाढू शकते

समजा तुमच्या पहिल्या Credit Card ची Limit ₹1 लाख आहे. दुसऱ्या Card ची Limit ₹1.5 लाख असेल, तर एकूण उपलब्ध Credit Limit ₹2.5 लाख होऊ शकते.