मुंबईची खबर : चर्चगेट ते विरार अंडरग्राऊंड लोकल सुरु होणार? काय आहे प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सध्या चर्चगेट ते विरार दरम्यान भूमिगत लोकल सुरु करण्याविषयी चर्चा सुरु आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
चर्चगेट ते विरार अंडरग्राऊंड लोकल सुरु होणार?
काय आहे प्लॅन?
Mumbai News : मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. चर्चगेट ते विरार दरम्यान भूमिगत लोकल रेल्वे नेटवर्कचा प्रस्ताव सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. पश्चिम रेल्वे (Western Railway) विभाग सध्या रेल्वे बोर्डाकडून निधी मंजूर होण्याच्या प्रतीक्षेत आहे. मुंबईच्या अतिशय व्यस्त रेल्वे नेटवर्कवरील ताण कमी करण्यासाठी या भूमिगत रेल्वेचा पर्याय तपासला जात आहे.
सविस्तर प्रकल्प अहवाल
या प्रकल्पासाठी बांधकाम विभाग आवश्यक आर्थिक मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा आहे. निधी मंजूर झाल्यानंतर, हा भूमिगत मार्ग तांत्रिक व आर्थिकदृष्ट्या शक्य आहे का हे ठरवण्यासाठी व्यवहार्यता अभ्यास केला जाईल. हा अहवाल अनुकूल आल्यास, प्रकल्पाचा आवाका, अंदाजे खर्च आणि अंमलबजावणीची गरज स्पष्ट करणारा 'सविस्तर प्रकल्प अहवाल' (Detailed Project Report - DPR) तयार केला जाईल.
हे ही वाचा : मनोज जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ बॉम्बवर शिंदेसेनेची पहिली प्रतिक्रिया
रेल्वेमंत्र्यांच्या दौऱ्यात चर्चा
हा प्रस्ताव 3 मार्च 2026 च्या पत्रानंतर पुढे आला असून, अहमदाबाद येथील रेल्वेमंत्र्यांच्या दौऱ्यातही यावर चर्चा झाली होती. प्रत्यक्षात बांधकाम सुरू करण्यापूर्वी प्रकल्प साध्य आहे का हे तपासणे ही पहिली प्राथमिकता आहे. यामध्ये प्रामुख्याने बांधकचा खर्च, जमिनीची उपलब्धता, तांत्रिक व्यवहार्यता, प्रवासी क्षमता आणि नवीन भूमिगत मार्ग विद्यमान रेल्वे नेटवर्कशी जोडणे या महत्त्वाच्या घटकांची तपासणी केली जाईल.
हे ही वाचा : 'तो मराठवाड्यात गिळून घेईल तुम्हाला...', जरांगेंनी ऐकवलेल्या खळबळजनक ऑडिओ क्लिपमधील प्रत्येक शब्द जसाच्या तसा...
कधी होणार प्रकल्प?
मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कवरील वाढत्या प्रवासी संख्येमुळे हा भूमिगत कॉरिडोअर प्रस्तावित करण्यात आला आहे. सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर दररोज सुमारे 1,414 ट्रेन धावतात, ज्यावरून या उपनगरीय प्रणालीवरील प्रवाशांच्या प्रचंड रहदारीचा अंदाज येतो. सध्या या अभ्यासाच्या पूर्णत्वाची किंवा बांधकामाची कोणतीही अधिकृत कालमर्यादा ठरलेली नाही.
