खासदारपुत्राच्या भरधाव कारने तरुणीला चिरडले, तरीही अटक नाहीच; नेमकं कारण काय?

मुंबई तक

एका राज्यसभा खासदाराच्या मुलाने 26 वर्षीय तरुणीला आपल्या कारखाली चिरडले आहे. मात्र त्याला अटक करण्यात आलेली नाही. याविषयी हैदराबाद पोलिसांनी नेमकं काय सांगितलं, जाणून घ्या.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

खासदारपुत्राच्या भरधाव कारने तरुणीला चिरडले

point

आरोपीला अटक नाहीच

point

नेमकं कारण काय?

Crime News : राज्यसभा खासदाराच्या मुलाने आपल्या आलिशान कारखाली एका तरुणीला चिरडल्याची घटना समोर येत आहे. हैदराबादमध्ये ही घटना घडली. हैदराबादमधील एका मॉलबाहेर भरधाव वेगाने आलेल्या आलिशान ॲस्टन मार्टिन कारने धडक दिल्यामुळे 26 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही भीषण दुर्घटना 16 ऑगस्ट रोजी घडली असून, आरोपीचं वय 23 वर्षे आहे. आंध्र प्रदेशातील राज्यसभा खासदाराचा हा मुलगा असून संजूष असं या आरोपीचं नाव आहे.

जेवण करुन परतताना काळाचा घाला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणीचं नाव भारती मुखी असे असून ती संबंधित मॉलमध्येच सेल्सवुमन म्हणून काम करत होती. घटनेच्या दिवशी दुपारच्या वेळी ती जेवण करून परत कामावर जात असताना, रस्ता ओलांडताना भरधाव आलिशान कारने तिला जोरदार धडक दिली. या धडकेत भारतीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

हे ही वाचा : धनुष्यबाण चिन्ह गोठवलं तर, कोणाला फायदा? आंबेडकरांचं मोठं विधान

खासदार पुत्राविरोधात गुन्हा

अपघातानंतर भारतीला तातडीने त्याच वाहनातून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणात माधापूर पोलिसांनी तपास करून गोळा केलेल्या पुराव्यांच्या आधारे, अपघाताच्या वेळी खासदारपुत्र संजूषच कार चालवत असल्याचे स्पष्ट झाले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजूष हा आंध्र प्रदेशातील जन सेना पार्टीचे राज्यसभा खासदार लिंगमनेनी रमेश यांचा तो मुलगा आहे.

हे ही वाचा : ग्राऊंड रिपोर्ट : 30 अटी, 10 शर्ती आणि पुण्यात राहुल गांधींची छात्रों की गुंज...

आरोपीला अटक का नाही?

मात्र, निष्काळजीपणामुळे हा अपघाती मृत्यू झाला असून हा गुन्हा जामीनपात्र असल्याने आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, पोलिसांनी संजूषला चौकशीसाठी नोटीस बजावली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. या घटनेबाबत खासदार लिंगमनेनी रमेश यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.