ग्राऊंड रिपोर्ट : 30 अटी, 10 शर्ती आणि पुण्यात राहुल गांधींची छात्रों की गुंज...
Rahul Gandhi pune chhatron ki goonj : राहुल गांधींचा 22 ऑगस्ट रोजी पुण्यात ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला पुणे पोलिसांनी सुमारे 30 अटी आणि नियमांसह परवानगी दिली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राहुल गांधींच्या पुणे सभेआधी पोलिसांची कडक नियमावली
30 अटींसह परवानगी, ड्रोन आणि आक्षेपार्ह बॅनरवर बंदी
पुणे : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा 22 ऑगस्ट रोजी पुण्यात ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रम होणार आहे. पुण्यातील एआयएसएसएमएस म्हणजेच ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी सुमारे आठ ते दहा हजार नागरिकांची उपस्थिती अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी कार्यक्रमाला सुमारे 30 अटी आणि नियमांसह परवानगी दिली आहे. काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी कार्यक्रमासाठी परवानगी मागितल्यानंतर पुणे शहर पोलीस उपायुक्त कार्यालय, परिमंडळ पाचकडून या अटी जारी करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा : नऊ वर्षांच्या मुलीवर भावासमोर लैंगिक अत्याचार, अखेर कुटुंबीयांना सांगितला घटनेचा थरार
अंदाजापेक्षा जास्त नागरिकांना प्रवेश देऊ नये
पोलिसांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी अंदाजापेक्षा जास्त नागरिकांना प्रवेश देऊ नये, असे स्पष्ट केले आहे. स्टेज आणि मंडप अधिकृत परवानाधारक व्यावसायिकांकडूनच तयार करून घ्यावा, अशी अट आहे. पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र आसनव्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच स्टेज तंदुरुस्त असल्याचे प्रमाणपत्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घेण्यास सांगण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी संबंधित सर्व विभागांची परवानगी आणि ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. नागरिकांच्या प्रवेशासाठी आणि बाहेर पडण्यासाठी किमान चार दरवाजे ठेवावेत, जेणेकरून गर्दी आणि चेंगराचेंगरीचा धोका निर्माण होणार नाही, असेही पोलिसांनी नमूद केले आहे.
हेही वाचा : 'धनुष्यबाण गोठवा' सुप्रीम कोर्टात ठाकरेंचा हा युक्तिवाद निकाल फिरवणार?
