'धनुष्यबाण गोठवा' सुप्रीम कोर्टात ठाकरेंचा हा युक्तिवाद निकाल फिरवणार?
shivsena hearing : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाने धनुष्यबाण चिन्ह देण्याची किंवा गोठवण्याची मागणी केली होती. त्यानंतर आज (दि.20) कोणता युक्तीवाद केला जाणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
ADVERTISEMENT

Shivsena hearing : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी काल (बुधवारी) धनुष्यबाण चिन्ह ठाकरे गटाला देण्याची किंवा ते गोठवण्याची मागणी केली होती. शिवसेना पक्षाची खरी ओळख कोणाची, यासोबतच आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही सुनावणीदरम्यान चर्चा होणार आहे.
हेही वाचा : सहकारी महिलेवर चाकूने चार वार, रेस्टॉरंटच्या स्वयंपाक घरात थरार, शांत डोक्याने कामावर लागला
आजच्या सुनावणीत देवदत्त कामत कोणता युक्तिवाद करणार, याकडे लक्ष लागले आहे. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात कोणते महत्त्वाचे मुद्दे मांडले जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रकरणात ठाकरे गटाकडून धनुष्यबाण चिन्हाबाबत स्पष्ट मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील आजच्या सुनावणीकडे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : 'सर, माझी बायको दुसऱ्यासोबत पळाली...' नवऱ्यानं उचललं भयानक पाऊल, काय घडलं?
