सहकारी महिलेवर चाकूने चार वार, रेस्टॉरंटच्या स्वयंपाक घरात थरार, शांत डोक्याने कामावर लागला

मुंबई तक

Jabalpur man stabs co-worker 4 times calmly returns to work : मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या महिलेची सहकाऱ्याने चाकूने हत्या केली. हल्ल्यानंतरही आरोपीने कोणतीही घाई न करता पुन्हा स्वयंपाकघरात काम सुरू केल्याचे CCTV मध्ये दिसत आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

सहकारी महिलेवर चाकूने चार वार

point

रेस्टॉरंटच्या स्वयंपाक घरात थरार

point

शांत डोक्याने कामावर लागला

MP Crime News : मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या एका महिलेची तिच्याच सहकाऱ्याने चाकूने भोकसून हत्या केली. या घटनेचा CCTV व्हिडिओ समोर आला आहे. जबलपूरमधील महफिल बार अँड रेस्टॉरंटमध्ये 14 ऑगस्टच्या संध्याकाळी ही घटना घडली. मुस्कान चौधरी असे मृत महिलेचे नाव आहे. पवनने स्वयंपाकघरात ठेवलेल्या चाकूने मुस्कानवर हल्ला केला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी पवनला अटक केली असून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा : Astrology : सिंह राशीतील सूर्य आणि केतूचा धोकादायक संयोग, 'या' राशींना सावध राहण्याचा इशारा

दोघांमध्ये काही कारणावरून वाद, नंतर पोटावर सपासप वार 

पोलिसांच्या तपासादरम्यान रेस्टॉरंटच्या स्वयंपाकघरात लावण्यात आलेल्या कॅमेऱ्याचे CCTV फुटेज मिळाले. जवळपास तीन मिनिटांच्या या फुटेजमध्ये संपूर्ण घटनाक्रम दिसत आहे. सुरुवातीच्या सुमारे एका मिनिटात मुस्कान आणि पवन स्वयंपाकघरात एकत्र काम करताना दिसतात. याचदरम्यान दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाल्याचे दिसते. त्यानंतर पवन अचानक संतापतो. तो स्वयंपाकघरात ठेवलेला चाकू उचलतो आणि मुस्कानजवळ जातो. त्यानंतर तिच्या पोटावर चाकूने वार करतो.

हेही वाचा : बायकोने दिलेला ज्यूस प्यायला अन् गेम झाला, प्रियकराच्या साथीने कविताने काटा काढला