Astrology : सिंह राशीतील सूर्य आणि केतूचा धोकादायक संयोग, 'या' राशींना सावध राहण्याचा इशारा
Astrology : सूर्य ग्रह हा आपल्या पहिल्या राशीत प्रवेश करत आहे, जिथे केतू हा आधीपासूनच आहे. यामुळे राग, चिडचिड किंवा गोंधळ निर्माण झाल्याची शक्यता आहे. अहंकार, करिअर किंवा आर्थिक बाबींबाबत घाईचे निर्णय घेऊ नका. सिंह राशीत आधीपासूनच असलेल्या केतूसोबत सूर्याचा हा संयोग 'सूर्य-केतू युती' निर्माण करत आहे, ज्याचा काही राशींवर परिणाम होईल.
ADVERTISEMENT

1/7
ज्योतिषशास्त्रात सूर्य ग्रहाचा आत्मा, पिता व आत्मविश्वासाचा कारक मानला जातो. तर केतू हा एकेकीपणा आणि आणि मानसिक तणावाचे प्रतीक आहे. 17 ऑगस्ट रोजी सूर्य ग्रहाने आपली स्वराशी सिंह आणि केतूने मघा नक्षत्रात प्रवेश केला. सिंह राशीत आधीपासूनच असलेल्या केतूसोबत सूर्याचा हा संयोग सूर्य-केतू युती निर्माण करत आहे. यासाठी काही राशींना सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

2/7
सूर्य ग्रह हा आपल्या पहिल्या राशीत प्रवेश करत आहे, जिथे केतू हा आधीपासूनच आहे. यामुळे राग, चिडचिड किंवा गोंधळ निर्माण झाल्याची शक्यता आहे. अहंकार, करिअर किंवा आर्थिक बाबींबाबत घाईचे निर्णय घेऊ नका. सिंह राशीत आधीपासूनच असलेल्या केतूसोबत सूर्याचा हा संयोग 'सूर्य-केतू युती' निर्माण करत आहे, ज्याचा काही राशींवर परिणाम होईल.

3/7
याचा परिणाम हा तुमच्या दहाव्या घरात जाणवेल. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात, वरिष्ठांशी तुमचे संबंध बिघडू शकतात किंवा कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याची किंवा नवीन नोकरी सुरू करण्याची घाई टाळा आणि वाहन चालवताना विशेष सावधानता बाळगावी.

4/7
कर्क
कर्क राशीच्या दुसऱ्या घरात धन आणि वाणीची निर्मिती होईल. अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे. कठोर शब्दांमुळे नातेसंबंधामुळे ताण निर्माण होऊ शकतो. या काळात उधार पैसे देणे किंवा जोखमीची गुंतवणूक करणे टाळावे आणि बोलताना शब्दांची काळजीपूर्वक निवड करा.

5/7
कुंभ
कुंभ राशीच्या सातव्या घरात तुमच्या जोडीदारासोबत अनावश्यक गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असते. व्यावसायिक भागीदारीत, कोणतेही दस्तऐवज न वाचता त्यावर सही करणे टाळा आणि चर्चेद्वारे कोणतेही प्रश्न् सोडवा.

6/7
मिथुन
मिथुन राशीच्या तिसऱ्या भावात युतीची निर्मिती होतेय. या परिस्थितीत कामांमध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. मेहनतीचं फळ थोड्या उशिराने मिळेल. भाऊ-बहिणींमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.

7/7
वृश्चिक
याचा परिणाम हा तुमच्या दहाव्या घरात जाणवेल. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात, वरिष्ठांशी तुमचे संबंध बिघडू शकतात किंवा कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याची किंवा नवीन नोकरी सुरू करण्याची घाई टाळा आणि वाहन चालवताना विशेष सावधानता बाळगावी.
