बायकोने दिलेला ज्यूस प्यायला अन् गेम झाला, प्रियकराच्या साथीने कविताने काटा काढला
Jaipur Crime News : जयपूरमध्ये पतीच्या हत्येप्रकरणी पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराला अटक करण्यात आली आहे. आजारपणामुळे मृत्यू झाल्याचे सुरुवातीला मानले जात असताना, पोलिसांच्या तपासात हा पूर्वनियोजित कट असल्याचे समोर आले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बायकोने दिलेला ज्यूस प्यायला अन् गेम झाला
प्रियकराच्या साथीने कविताने काटा काढला
Jaipur Crime News : ज्यूसमध्ये विष मिसळून पतीची हत्या केल्याच्या आरोपावरून एका महिलेला आणि तिच्या कथित प्रियकराला अटक करण्यात आली आहे. महेश मीना असे मृत व्यक्तीचे नाव असून तो 27 वर्षांचा होता. त्याची पत्नी कविता मीना (वय 23) कथित प्रियकर गणेश मीना (वय 27) याच्यासोबत मिळून महेशच्या हत्येचा कट रचल्याचं समोर आलंय. नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात..
हेही वाचा : '... नाही तर धनुष्यबाण गोठवा!', ठाकरेंच्या वकिलांची आतापर्यंतची सर्वात मोठी मागणी.. शिंदेंना बसणार झटका?
कविताने महेशला ज्यूसमधून विष दिल्याचा आरोप
पोलिसांच्या तपासानुसार, कविताने महेशला ज्यूसमधून विष दिल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर सुरुवातीला महेशचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे मानले जात होते. मात्र, नंतर परिस्थिती संशयास्पद वाटू लागल्याने या प्रकरणाचा तपास करण्यात आला. ही घटना जयपूरमधून समोर आलीये.
हेही वाचा : '... नाही तर धनुष्यबाण गोठवा!', ठाकरेंच्या वकिलांची आतापर्यंतची सर्वात मोठी मागणी.. शिंदेंना बसणार झटका?
