'सर, माझी बायको दुसऱ्यासोबत पळाली...' नवऱ्यानं उचललं भयानक पाऊल, काय घडलं?
पत्नी तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याने व्यथित झालेल्या उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीने एक भयंकर पाऊल उचलले. रुग्णालयात मृत्यू होण्यापूर्वी, पत्नीला हाक मारून त्यांनी आपल्या व्यथा व्यक्त केली. त्याच्या मृत्यूनंतर पाच निरागस मुले आपल्या आईवडिलांविना पोरकी झाली आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'सर, माझी बायको दुसऱ्यासोबत पळाली...'
नवऱ्यानं उचललं भयानक पाऊल
काय घडलं?
Crime News : एक अत्यंत काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. ज्या घरात लहान मुलांचं हसू आणि किलबिलाट ऐकू येत होता, तिथे आज केवळ हुंदके आणि स्मशानशांतता पसरली आहे. लल्लू गौतम नावाचा एक व्यक्ती मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. हलाखीची परिस्थिती असतानाही पाच मुले आणि पत्नीसोबतचा त्यांचा छोटेसा संसार हेच त्यांच्या जगण्याचे मोठे बळ होते. मात्र, एका दुर्दैवी वळणाने या हसत्या-खेळत्या कुटुंबाची पूर्णपणे राखरांगोळी केली आहे. उत्तर प्रदेशातील भदोहा जिल्ह्यातील ही घटना आहे.
तरीही पत्नीचे मन विरघळले नाही
सुमारे दोन महिन्यांपूर्वी लल्लू यांची पत्नी पाच लहान मुलांना आणि पतीला वाऱ्यावर सोडून आपल्या प्रियकरासोबत पळून गेली. पत्नी निघून गेल्यानंतर लल्लू पूर्णपणे खचून गेले होते. मुलांच्या मातृसुखासाठी आणि भविष्यासाठी ते फोनवरून पत्नीला सतत परत येण्याची विनवणी करत राहिले. निष्पाप मुलांची शपथ देऊनही त्या कठोर मनाच्या स्त्रीचे हृदय विघळले नाही आणि ती परत आली नाही. दिवस-रात्र मेहनत करून लल्लू मुलांचे पोट तर भरत होते, पण पत्नीच्या विरहाचे दुःख आणि मुलांच्या पोरकेपणाच्या काळजीने त्यांना पुरते ग्रासले होते.
हे ही वाचा : राष्ट्रीय महामार्गावर ट्रक जळून चालकाचा मृत्यू, पण पोलीस तपासात भयंकर कांड उघडकीस
'साहेब, माझी बायको दुसऱ्यासोबत पळून गेली'
अखेर सततच्या मानसिक तणावातून आणि नैराश्यातून त्यांनी बुधवारी (19 ऑगस्ट) विष प्राशन करून आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले. तब्येत खालावल्यानंतर नातेवाइकांनी त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात आणि नंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूच्या अवघ्या काही क्षण आधी त्यांनी पोलीस आणि डॉक्टरांसमोर आपले दुःख मांडताना सांगितले, "साहेब, माझी बायको दुसऱ्यासोबत पळून गेली, मी तिला बोलावून बोलावून थकलो होतो." हे शेवटचे शब्द उपस्थितांच्या काळजाला घर पाडून गेले.
हे ही वाचा : घरात घुसून मुख्याध्यापिकेवर केले 27 वार, 10 वीच्या विद्यार्थ्यांचं कृत्य; धक्कादायक कारण समोर
मुलांचा सांभाळ कोण करणार?
या संपूर्ण वेदनादायी घटनेतील सर्वात दुर्दैवी आणि संवेदनशील बाब म्हणजे ती पाच निष्पाप मुले, जी आता या जगात पूर्णपणे अनाथ झाली आहेत. दोन महिन्यांपूर्वी आईचे छत्र हरपले होते आणि आता बापही कायमचा निघून गेला आहे. सध्या पोलीस या प्रकरणी पुढील कायदेशीर तपास करत आहेत. मात्र, गावकऱ्यांचे डोळे अश्रूंनी भरले असून, 'या निर्दयी जगात आता या अनाथ चिमुकल्यांचा सांभाळ कोण करणार?' हा एकच यक्षप्रश्न संपूर्ण गावाला छळत आहे.
