घरात घुसून मुख्याध्यापिकेवर केले 27 वार, 10 वीच्या विद्यार्थ्यांचं कृत्य; धक्कादायक कारण समोर

मुंबई तक

एका दहावीच्या विद्यार्थ्याने शाळेच्या मुख्याध्यापिकेवर 27 वार करुन तिची हत्या केली. पोलीस तपास करत असताना यामागील धक्कादायक कारणाचा उलगडा झाला. तेलंगणातील ही घटना नेमकी काय आहे, जाणून घ्या.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुख्याध्यापिकेवर केले 27 वार

point

10 वीच्या विद्यार्थ्यांचं कृत्य

point

धक्कादायक कारण समोर

Crime News : तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या एका धक्कादायक घटनेमागील रहस्य अखेर उलगडले आहे. कोंडामल्लेपल्ली भागात राहणाऱ्या 50 वर्षीय मुख्याध्यापिका रूपा रेड्डी यांच्या हत्येने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. पती कामानिमित्त हैदराबादला गेल्याने त्या घरी एकट्याच होत्या. पतीच्या वारंवारच्या फोनला कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने संशय बळावला आणि शेजाऱ्यांच्या मदतीने 12 ऑगस्टच्या सकाळी पोलिसांना पाचारण करण्यात आले. घराचा दरवाजा उघडताच समोर आलेले दृश्य पोलिसांचेही मन सुन्न करणारे होते.

गूढ हत्येचा छडा लावण्याचे आव्हान

रूपा रेड्डी यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता आणि त्यांच्या शरीरावर तब्बल 27 वेळा वार करण्यात आले होते. सुरुवातीला हा प्रकार वैयक्तिक वैमनस्यातून घडल्याचा संशय व्यक्त केला जात होता, मात्र हत्येचा हा निर्घृण पॅटर्न पाहता पोलिसही चक्रावून गेले. घरफोडी किंवा चोरीच्या उद्देशाने हे कृत्य घडले असावे असा प्राथमिक अंदाज होता, पण गुन्हेगाराने अत्यंत शिताफीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. कोणत्याही ठोस सुगाव्याशिवाय पोलिसांसमोर या गूढ हत्येचा छडा लावण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले होते.

हे ही वाचा : Maharashtra Weather : हवामानाच्या दिशेत बदल, कुठे कोसळधारा तर कुठे वादळ

प्रकरणाला मिळाले अनपेक्षित वळण

तपासाची चक्रे वेगाने फिरवत तपास पथकाने तपासाला सुरुवात केली. संशयितांचा शोध घेत असताना पोलिसांना मिळालेल्या एका गुप्त माहितीने या प्रकरणाला अनपेक्षित वळण दिले. चोरीच्या इराद्याने घरात घुसलेल्या गुन्हेगारांचा मागोवा घेत असताना पोलिसांचा संशय थेट एका शाळेच्या विद्यार्थ्यांवर गेला. पोलिसांनी तातडीने हालचाली करत दोन 16 वर्षीय अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आणि त्यांची कसून चौकशी सुरू केली.

हे ही वाचा : Personal Finance: ‘No Cost EMI’ खरंच No Cost असते का? वेळीच समजून घ्या, नाहीतर...

मुख्याध्यापिकेवर 27 वार

चौकशीदरम्यान समोर आलेल्या सत्याने पोलिसांनाही धक्का बसला. दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्यानेच चोरीच्या उद्देशाने घरात घुसून मुख्याध्यापिकेवर 27 वेळा चाकूने प्राणघातक वार करून त्यांची हत्या केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यात त्याच्या दुसऱ्या अल्पवयीन मित्रानेही मदत केली होती. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या रक्ताने माखलेल्या नोटा आणि मोबाईल फोन या प्रकरणातील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे पुरावे ठरले आहेत. एका शाळेतील विद्यार्थ्यांनीच आपल्या प्राचार्यांचा असा निर्घृण बळी घेतल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.