Personal Finance: ‘No Cost EMI’ खरंच No Cost असते का? वेळीच समजून घ्या, नाहीतर...

रोहित गोळे

No Cost EMI खरंच व्याजमुक्त आणि अतिरिक्त खर्चाशिवाय असतं का? Processing Fee, GST, Discount आणि Credit Card Chargesसह No Cost EMIमागचं संपूर्ण गणित समजून घ्या.

ADVERTISEMENT

no cost emi hidden charges interest processing fee personal finance
Personal Finance
Google CTA

मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही, फ्रीज किंवा महागड्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करताना ‘No Cost EMI’ हा पर्याय ग्राहकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करतो. “व्याज नाही, अतिरिक्त खर्च नाही आणि वस्तू आता घ्या, पैसे नंतर हप्त्याने द्या” अशी या ऑफरची जाहिरात केली जाते. मात्र No Cost EMI म्हणजे वस्तूवर कोणताही अतिरिक्त खर्चच नाही, असा सरळ अर्थ काढणे योग्य नाही. खरेदी करण्यापूर्वी EMIची रचना, Processing Fee, Discount, GST आणि इतर शुल्क तपासणे महत्त्वाचे आहे.

No Cost EMI म्हणजे नेमकं काय?

सामान्य EMIमध्ये ग्राहक मूळ रकमेबरोबर व्याजही भरतो. मात्र No Cost EMIमध्ये ग्राहकाकडून आकारले जाणारे व्याज व्यापारी किंवा ब्रँडकडून upfront discount/subventionच्या माध्यमातून भरून काढले जाऊ शकते. त्यामुळे ग्राहकाला EMIमध्ये स्वतंत्रपणे व्याज आकारले जात नसल्याचे दिसते.

RBIच्या नियमांनुसार, क्रेडिट कार्ड व्यवहार EMIमध्ये रूपांतरित करताना मूळ रक्कम, व्याज आणि व्यापारी/कार्ड जारीकर्त्याने दिलेली upfront discount ग्राहकाला स्पष्टपणे दाखवणे आवश्यक आहे. व्याज असलेल्या EMIला लपवून ‘zero-interest’ किंवा ‘no-cost EMI’ म्हणून दाखवता येत नाही.

मग ‘No Cost’ असूनही खर्च कुठे होऊ शकतो?

समजा एखाद्या वस्तूची किंमत ₹60,000 आहे. ती 12 महिन्यांच्या No Cost EMIवर घेतली. जाहिरातीमध्ये EMI ₹5,000 सांगितली असेल, तरी अंतिम खर्च तपासताना खालील बाबी पाहणे गरजेचे आहे: