CJP च्या आंदोलनाची दिल्ली पोलिसांना धडकी, थेट दिल्लीच्या बॉर्डर सील करणं सुरू
दिल्लीमध्ये 10 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या CJP आंदोलनापूर्वी पोलिसांनी जंतर-मंतरवरील प्रदर्शनाला परवानगी नाकारली असून, 57 मेट्रो स्थानकांचे गेट बंद करण्याची मागणी मान्य झाल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या 10 ऑक्टोबर रोजी प्रस्तावित आंदोलनापूर्वी राजधानीतील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. जंतर-मंतर येथे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. मात्र, दिल्ली पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. दुसरीकडे, 57 मेट्रो स्थानकांचे प्रवेश आणि बाहेर पडण्याचे गेट बंद करण्याची मागणी मान्य झाल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वे गाड्या रद्द झाल्याने हजारो प्रवाशांना फटका बसला असून, दिल्ली-नोएडा सीमेवरील चिल्ला बॉर्डरवरही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
CJP आंदोलनाला परवानगी का नाकारली?
दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, CJP कडून आंदोलनासाठी परवानगी मागणारा अर्ज 7 ऑक्टोबर रोजी प्राप्त झाला होता. मात्र, प्रस्तावित आंदोलनाची तारीख 10 ऑक्टोबर असल्याने निर्धारित प्रक्रियेनुसार आवश्यक असलेली पूर्वसूचना देण्यात आली नव्हती.
याशिवाय, यापूर्वी झालेल्या आंदोलनांमध्ये नियमांचे कथित उल्लंघन झाल्याचाही उल्लेख पोलिसांनी केला आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली.
हे ही वाचा>> 'तुमच्या मुलांना आणि शेजाऱ्यांना समजून सांगा की...', CJP आंदोलनाच्या आधी पोलिसांची गल्ली-बोळात जाऊन घोषणा!
नवी दिल्ली परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम 163 अंतर्गत निर्बंध लागू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या निर्बंधांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.
