बुलढाणा हादरलं! प्रॉपर्टीच्या वादातून तरुणानं आई, भाऊ आणि भाच्याला संपवलं
Buldhana Crime News : बुलढाणा जिल्ह्यातून मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका कुटुंबातील 3 सदस्यांवर धारदार हत्याराने हल्ला करत खून करण्यात आला. या घटनेनं बुलढाणा जिल्ह्यांत एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
शेतजमीन मृत मुलाच्या नावावर केल्यावरून वाद
जगदीश सुरडकरने तिघांवरही केला हल्ला
Buldhana Crime News : जका खान - बुलढाणा जिल्ह्यातून मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका कुटुंबातील 3 सदस्यांवर धारदार हत्याराने हल्ला करत खून करण्यात आला. या घटनेनं बुलढाणा जिल्ह्यांत एकच खळबळ उडाली आहे. या हत्येत एका वृद्ध महिलेचा देखील समावेश करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच बुलढाण्यातील चिखली पोलिसांना घटनेची माहिती दिली होती.
हे ही वाचा : मुंबईत बिर्याणीत मिसळलं विष, बापानेच लेकीला संपवल्याची घटना
मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात
घडलेल्या घटनेनुसार, जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील सोमठाणा गावातील रहिवासी सरस्वती सुरडकर (वय 70), मुलगा संजय फत्तेसिंग सुरडकर (वय 55) आणि नातू रणजित सुरडकर (वय 25) यांचे मृतदेह रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घरात आढळून आले होते. या घटनेची माहिती चिखली पोलिसांना देण्यात आली होती. यानंतर घटनास्थळी पोलिसांचे पथक पोहोचल्यानंतर मृतदेह हे रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले होते.
शेतजमीन मृत मुलाच्या नावावर केल्यावरून वाद
धारदार शस्त्राचा वापर करून ही हत्या करण्यात आली. ग्रामस्थांनी सांगितले की, त्या वृद्ध महिलेला दीपक नावाचा आणखी एक मुलगा आहे, जो घटनास्थळी उपस्थित नव्हता. संबंधित प्रकरणात मृत संजय सुरडकरच्या पत्नीने पोलिसांना घटनेची तक्रार केली, त्या तक्रारीत तिने सांगितलं की, शेतजमिनीच्या बक्षीसपत्रावरून कुटुंबात वाद झाला होता. वृद्ध महिलेनं आपली शेतजमीन ही मृत व्यक्ती संजयच्या नावावर केली होती.
हे ही वाचा : दुहेरी हत्याकांड! होमगार्डने पत्नी आणि मुलीची डेटा केबलनं गळा आवळून केली हत्या
जगदीश सुरडकरने तिघांवरही केला हल्ला
यानंतर पुढे दीपक सुरडकर आणि त्याचा मुलगा जगदीश सुरडकर यांनी तिघांवर हल्ला केला, ज्यात त्यांचा मृत्यू झाला. सायंकाळी चिखली पोलिसांनी जगदीश सुरडकरच्या मुसक्या आवळल्या आहेत, नंतर त्याला न्यायालयात हजर केले आहे. न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोढटी सुनावली आहे. मात्र, वृद्ध महिलेची हत्या करणारा धाकटा मुलगा दीपक सुरडकर हा अद्याप फरार असल्याची माहिती समोर आली.
