Maharashtra Weather : हवामानाच्या दिशेत बदल, कुठे कोसळधारा तर कुठे वादळ
Maharashtra Weather : राज्यात सध्या पावसाची संथ स्थिती दिसून येते. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता ही कमी आहे. अशातच जाणून घेऊयात 20 ऑगस्ट 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यात हलका ते मध्यम
तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज
जाणून घ्या 20 ऑगस्ट रोजी राज्यातील हवामान
Maharashtra Weather : हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांना हलका ते मध्यम, तर काही ठिकाणी मध्यम, तसेच कुठे हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तविलेला आहे. थोडक्यात काय तर सध्या पावसाची संथ स्थिती दिसून येते. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता ही कमी आहे. अशातच जाणून घेऊयात 20 ऑगस्ट 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज.
हे ही वाचा : नवरा-बायकोत वाद, फेसबुक लाईव्ह येऊन पतीनं संपवलं जीवन
कोकण
कोकण विभागातील पालघर आणि मुंबईमध्ये हलक्या स्वरुपाचे हवामान राहण्याची अधिक शक्यता आहे. रत्नागिरी आणि ठाणे येथे हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. रायगड आणि सिंधुदुर्गात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीये.
उत्तर महाराष्ट्र
धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांत हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. जळगाव, नाशिक आणि नाशिक घाटमाथा परिसरात विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. अहिल्यानगरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा आणि सांगली या तीन जिल्ह्यांत हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. पुण्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा आणि पुणे घाटमाथा परिसरात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे.
