'मुख्याध्यापक आणि शिक्षिका एकाच बंद खोलीत...' विद्यार्थ्यांनी शिकवला धडा!
शाळा सुटण्याची वेळ सायंकाळी साडेचार. पण शाळा तीन वाजताच सोडून मुख्याध्यापक आणि अतिथी शिक्षिका खोली बंद करुन बसतात, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. मध्यप्रदेशातील या शाळेत नेमकं काय घडलं?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'मुख्याध्यापक आणि शिक्षिका एकाच बंद खोलीत...'
विद्यार्थ्यांनी शिकवला धडा!
Crime News : एका शाळेतून धक्कादायक घटना समोर येत आहे. शाळकरी मुलांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर आपल्याच शाळेची पोलखोल केली. त्यानंतर हा प्रकार समोर आला. या प्रकरणामुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्था आणि प्रशासकीय तपासणी यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक पातळीवर दाद न मिळाल्याने आदिवासी शाळकरी मुले आणि ग्रामस्थांनी सुमारे 100 किलोमीटरचा प्रवास करत जिल्हा मुख्यालय गाठले आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या जनसुनावणीत आपली व्यथा मांडली. मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील ही घटना आहे.
शिक्षक मोबाईलवर व्यस्त
जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार नोंदवताना विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी प्रभारी मुख्याध्यापक आणि एका महिला अतिथी शिक्षिकेवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. शाळेतील शैक्षणिक उपक्रम पूर्णपणे ठप्प पडल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. दोन्ही शिक्षक वर्गात शिकवण्याऐवजी दिवसभर मोबाईलमध्ये व्यस्त असतात. शाळेची अधिकृत वेळ सायंकाळी 4.30 पर्यंत असतानाही, विद्यार्थ्यांना दुपारी 3 वाजताच जबरदस्तीने घरी पाठवून दिले जात असल्याचे मुलांनी सांगितले.
हे ही वाचा : तीन वर्षांचं लेकरु बोअरवेलमध्ये पडलं, 3 तास रेस्क्यू, शेवटी असं काही घडलं की...VIDEO
7 वाजेपर्यंत एकाच खोलीत
विद्यार्थ्यांनी उघडपणे आरोप केला आहे की, त्यांना घरी पाठवल्यानंतर हे दोन्ही शिक्षक सायंकाळी 7 वाजेपर्यंत शाळेच्या एकाच खोलीत बसलेले असतात. या दरम्यान कोणत्याही विद्यार्थ्याला किंवा बाहेरील व्यक्तीला आत जाण्याची परवानगी नसते. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या गंभीर गैरकारभाराबाबत आणि शिक्षकांच्या अनैतिक वर्तनाबाबत त्यांनी यापूर्वीच गट शिक्षण अधिकारी (BEO) आणि आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कोणतीही कारवाई झाली नाही.
हे ही वाचा : महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक कायम; पण 'या' जिल्ह्यांना अलर्ट, अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस
पुढं काय होणार?
अधिकाऱ्यांच्या या ढिम्म कारभाराला कंटाळून ग्रामस्थांनी 16 ऑगस्ट रोजी आयोजित ग्रामसभेत एकमुखाने ठराव मंजूर करून दोन्ही शिक्षकांना तात्काळ हटवण्याची मागणी केली होती. सुमारे 100 किलोमीटरवरून आलेल्या विद्यार्थ्यांची ही व्यथा ऐकून जनसुनावणीत एकच खळबळ उडाली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आदिवासी विकास विभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले असून, दोषींवर कडक दंडात्मक कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे.
