तीन वर्षांचं लेकरु बोअरवेलमध्ये पडलं, 3 तास रेस्क्यू, शेवटी असं काही घडलं की...VIDEO

मुंबई तक

parbhani kausadi news : परभणी जिल्ह्यातील कौसडी येथे शेतात खेळत असताना तीन वर्षांचा चिमुकला बोअरवेलमध्ये पडला. तब्बल तीन तासांच्या बचाव कार्यानंतर त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले.

ADVERTISEMENT

parbhani kausadi news
parbhani kausadi news
Google CTA

बातम्या हायलाइट

point

तीन वर्षांचं लेकरु बोअरवेलमध्ये पडलं,

point

3 तास रेस्क्यू, शेवटी असं काही घडलं की...VIDEO

parbhani kausadi news, दिलीप माने : परभणी जिल्ह्यातील कौसडी येथे तीन वर्षांचा चिमुकला बोअरवेलमध्ये पडल्याने एकच खळबळ उडाली होती. तब्बल तीन तासांच्या थरारक रेस्क्यू ऑपरेशननंतर त्याला बाहेर काढण्यात यश आलंय. शेतात खेळत असताना शेख अदनान शेख नदीम हा तीन वर्षीय मुलगा बोअरवेलमध्ये पडला. या घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी गर्दी झाली. चिमुकला बोअरवेलमध्ये अडकल्याने त्याच्या सुटकेसाठी बचावकार्य सुरू करण्यात आले. या घटनेमुळे कुटुंबीयांसह गावकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती.

हेही वाचा : '... नाही तर धनुष्यबाण गोठवा!', ठाकरेंच्या वकिलांची आतापर्यंतची सर्वात मोठी मागणी.. शिंदेंना बसणार झटका?

बोअरवेलच्या दोन्ही बाजूला खड्डा खांदून काढलं बाहेर 

घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने मदत कार्याला सुरुवात केली. बचाव कार्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली. घटनास्थळी डॉक्टरांची टीम, ऑक्सिजन सिलेंडर आणि ॲम्बुलन्स पाठवण्यात आली. चिमुकल्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी बोअरवेलच्या दोन्ही बाजूला खड्डा खणण्याचे काम करण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान चिमुकल्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाकडून प्रयत्न सुरू होते.

हेही वाचा : पुणे: NCP चे आमदार म्हणतात, 'रस्ते आहेत तर अपघात होणारच...' प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारवरच चिडले