महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक कायम; पण 'या' जिल्ह्यांना अलर्ट, अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस
maharashtra weather update : महाराष्ट्रातील पावसाचा दडी मारली असून अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. पुढील 48 तासांत मराठवाड्यातील काही भागांत हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी वाऱ्यांची शक्यता आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक कायम; पण 'या' जिल्ह्यांना अलर्ट
अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस
maharashtra weather update : महाराष्ट्रात सध्या पावसाचा ब्रेक कायम असून राज्यातील बहुतांश भागात मुसळधार किंवा अतिमुसळधार पावसाची शक्यता कमी आहे. अनेक ठिकाणी हलक्या सरी पडत असल्या तरी पावसाचा जोर वाढलेला दिसत नाही. Monsoon Activity कमकुवत झाल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा कायम असून हे अंतर वाढताना दिसत आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सध्या बिहार आणि उत्तर प्रदेशच्या दिशेने पोहोचले आहे. त्याचा परिणाम मध्य प्रदेशातील हवामानावर होत असून विदर्भातही काही प्रमाणात त्याचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. मात्र महाराष्ट्रात त्याची तीव्रता फारशी नसणार आहे.
हेही वाचा : '... नाही तर धनुष्यबाण गोठवा!', ठाकरेंच्या वकिलांची आतापर्यंतची सर्वात मोठी मागणी.. शिंदेंना बसणार झटका?
मराठवाड्यातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस
अरबी समुद्रातून येणारे नैऋत्य मोसमी वारे सक्रिय असले तरी महाराष्ट्रावर त्यांचा फार मोठा परिणाम सध्या दिसत नाही. महाराष्ट्राच्या काही भागांवर ढगांची निर्मिती होताना दिसत असून विदर्भ आणि मराठवाड्यातही काही प्रमाणात ढग तयार झाले आहेत. यामुळे मराठवाड्यातील काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील पावसाच्या स्थितीकडे पाहिल्यास मराठवाड्यातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. परभणीत सरासरीपेक्षा 22 टक्के, नांदेडमध्ये 20 टक्के, लातूरमध्ये 23 टक्के आणि धाराशिवमध्ये 20 टक्के कमी पाऊस झाला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली येथेही सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून गडचिरोलीत 23 टक्के, तर अमरावतीत 31 टक्के कमी पाऊस नोंदवण्यात आला आहे.
हेही वाचा : पुणे: NCP चे आमदार म्हणतात, 'रस्ते आहेत तर अपघात होणारच...' प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारवरच चिडले
