पेरूचं आमिष, आवाज नको म्हणून... जुन्नरच्या घटनेची हादरवून टाकणारी इनसाईड स्टोरी

ओमकार वाबळे

जुन्नरच्या पिंपळवंडी परिसरात आजारी असल्यामुळे शाळेत न गेलेल्या अल्पवयीन मुलीला पेरूच्या बागेत नेण्यात आलं. सीसीटीव्हीपासून पोस्टमॉर्टमपर्यंत पोलिसांच्या तपासात काय समोर आलं, जाणून घ्या संपूर्ण Inside Story.

ADVERTISEMENT

junnar minor girl murder case inside story pimpalwandi pune police investigation
Junnar Minor Girl Case
Google CTA

पुणे: पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपळवंडी धरण परिसरातील गावात घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. आजारी असल्यामुळे शाळेत न गेलेली सुमारे साडेनऊ वर्षांची मुलगी दुपारी घरी टीव्ही पाहत होती. याचवेळी तिच्या ओळखीचा, शेजारी राहणारा 24 वर्षीय तरुण तिच्याकडे आला आणि पेरूच्या बागेत घेऊन जाण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर घडलेल्या घटनांचा तपास पोलिसांनी सीसीटीव्ही आणि चौकशीच्या आधारे उलगडला.

आजारी असल्याने मुलगी घरीच 

घटनेच्या दिवशी मुलीची तब्येत ठीक नव्हती. व्हायरल इन्फेक्शन झाल्यामुळे ती शाळेत गेली नव्हती. तिचे आई-वडील रोजंदारीच्या कामासाठी सकाळी घराबाहेर गेले होते. त्यामुळे दुपारच्या वेळी मुलगी घरी एकटीच होती आणि टीव्ही पाहत होती.

दुपारी साधारण तीन ते साडेतीनच्या सुमारास तिच्या घरासमोर राहणारा 24 वर्षीय तरुण तिच्याकडे आला. मुलगी त्याला आधीपासून ओळखत होती. दोन्ही कुटुंबे एकमेकांच्या परिचयाची असल्याने त्याच्यावर मुलीचा विश्वास असण्याची शक्यता होती.

हे ही वाचा>> पुणे : घरात एकट्या असलेल्या मुलीवर शेतात नेऊन अत्याचार अन् मर्डर, 'त्या' चुकीने आरोपी सापडला

या तरुणाने मुलीला पेरूच्या बागेत चल, तुला पेरू काढून देतो, असे सांगितले. त्यानंतर तो तिला सायकलवर बसवून घेऊन गेला. संध्याकाळी आई-वडील घरी आले अन् मुलगी गायब असल्याचं लक्षात आलं