मालकाच्या बायकोसोबत अल्पवयीन मुलाचे अनैतिक संबंध, नात्याचा भयंकर शेवट

मुंबई तक

एका व्यावसायिकाची अल्पवयीन मुलाने गोळ्या घालून हत्या केली. याप्रकरणी तपास करत असताना उत्तराखंड पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली अन् सगळेत जण हादरुन गेले. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह मृताच्या बायकोला अटक करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

मालकाच्या बायकोसोबत अल्पवयीन मुलाचे अनैतिक संबंध

point

नात्याचा झाला भयंकर शेवट

Crime News : एका कारमध्ये रक्ताच्या थारोळ्यात सापडलेल्या व्यावसायिक संजीव कुमार यांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. या हत्याकांडात मृत संजीव यांची पत्नी निशा हिचाच सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे. पती-पत्नीमधील सततच्या वादाला कंटाळून पत्नीने तिच्या दुकानावर काम करणाऱ्या अल्पवयीन प्रियकराच्या मदतीने संजीव यांचा काटा काढण्याचा कट रचला होता. पत्नीच्या सांगण्यावरून तिच्या अल्पवयीन प्रियकराने आपल्या एका साथीदारासह संजीव यांची गोळ्या झाडून हत्या केली. उत्तराखंडमधील प्रतापपूर भागातील ही घटना आहे.

दुकानातील अल्पवयीन मुलासोबत प्रेमसंबंध

17 ऑगस्ट रोजी संजीव कुमार यांचा मृतदेह कारमध्ये आढळला होता. सुरुवातीला हा अपघात वाटत असला, तरी शवविच्छेदनादरम्यान गळ्यावरील खुणा संशयास्पद आढळल्याने पोलिसांनी पत्नी निशाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. मात्र, निशाचे जबाब आणि तिचे मोबाईल सीडीआर, लोकेशन, तसेच सीसीटीव्ही फुटेज यांमध्ये मोठा विरोधाभास दिसून आला. अधिक तपासात रामनगर येथील दुकानात काम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाचे निशासोबत प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. याच प्रेमसंबंधातून आणि कौटुंबिक वादातून दोघांनी मिळून संजीव यांच्या हत्येचा कट रचला होता.

हे ही वाचा : घरात घुसून मुख्याध्यापिकेवर केले 27 वार, 10 वीच्या विद्यार्थ्यांचं कृत्य; धक्कादायक कारण समोर

निशाला केला मेसेज- 'काम झाले'

16 ऑगस्ट रोजी वाढदिवसाच्या पार्टीचे निमित्त करून दोन्ही अल्पवयीन आरोपींनी संजीव यांच्यासोबत रामनगर येथे जाण्याचे नियोजन केले. परतीच्या प्रवासात संजीव गाडी चालवत असताना मागे बसलेल्या अल्पवयीन आरोपीने 12 बोरच्या गावठी कट्ट्याने त्यांच्या गळ्यावर थेट गोळी झाडली. गोळी लागताच कार अनियंत्रित होऊन शेतात शिरली. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले आणि त्यांनी लगेचच निशाला 'काम झाले' असा मेसेज पाठवला. पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून हत्येत वापरलेले शस्त्र, जिवंत काडतूस आणि रक्ताने माखलेले कपडे जप्त केले आहेत.

हे ही वाचा : बायकोने दिलेला ज्यूस प्यायला अन् गेम झाला, प्रियकराच्या साथीने कविताने काटा काढला

दोन अल्पवयीन आरोपी ताब्यात

या प्रकरणी पोलिसांनी पत्नी निशाला अटक केली असून दोन्ही अल्पवयीन सह-आरोपींवर बाल न्याय कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तपासात असेही निष्पन्न झाले आहे की, या हत्येसाठी लागणारे बेकायदेशीर शस्त्र आणि काडतुसे महिनाभरापूर्वीच खरेदी करण्यात आली होती. ज्या व्यक्तीकडून हे बेकायदेशीर शस्त्र विकत घेण्यात आले होते, तो आरोपीही सध्या पोलिसांच्या रडारवर असून लवकरच त्याच्यावरही कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती एसएसपी अजय गणपती यांनी दिली.