'बिश्नोईला साबरमतीतून खेचून आणून दाखवा'; उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना आव्हान, शेतकरी मदतीवरूनही घेरलं

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात टायगर श्रॉफवरील हल्ला, लॉरेन्स बिश्नोई आणि शेतकरी मदतीच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली. देवेंद्र फडणवीस यांना बिश्नोईला साबरमतीतून आणण्याचं आव्हानही त्यांनी दिलं.

ADVERTISEMENT

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

'बिश्नोईला साबरमतीतून खेचून आणून दाखवा';

point

उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना आव्हान, शेतकरी मदतीवरूनही घेरलं

Uddhav Thackeray, मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा उल्लेख करत ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात बोलताना राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. "हल्ल्यानंतर पोलिसांनी आरोपींना पकडलं, याचं कौतुक करण्यापेक्षा असा हल्ला होऊच कसा दिला? याचं उत्तर सरकारने द्यावं. सुदैव त्या पोराचं म्हणून तो पोरगा वाचला. पण गोळी जर वर्मी लागली असती आणि मग पोलिसांनी हे गुंड पकडले असते, तर उपयोग काय?  नवरात्रोत्सवात नाकाबंदी सुरू असताना शस्त्र घेऊन आलेले आरोपी पोलिसांच्या नजरेतून कसे सुटले?" असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. शिवाय, देवेंद्र फडणवीस यांनी बिश्नोईला साबरमती तुरुंगातून महाराष्ट्रात आणून दाखवावं, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं.

गेल्या वर्षीच्या 31 हजार कोटी रुपयांचं पॅकेजचं काय झालं? 

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान, दुष्काळाची शक्यता आणि मदतीच्या घोषणांवरून सरकारला धारेवर धरलं. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे जमिनीचा वरचा थर वाहून गेला, विहिरी गाळाने भरल्या आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी 31 हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं होतं. मात्र, प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांना मदत मिळाली? शेतकऱ्यांना सात रुपये आणि एक रुपयाचे धनादेश मिळाल्याचा उल्लेख करत त्यांनी मदतीच्या पद्धतीवर टीका केली. 

हेही वाचा : “एकनाथ शिंदेंनी भाजपकडून 500 कोटी घेऊन मला...”; मनोज जरांगेंनी थेट शिंदेंना आव्हान देत उडवून दिली खळबळ!

नमो किसान योजनेचे चार हजार रुपयांचे दोन हप्ते अद्याप मिळाले नाहीत. आताचे पाच हजार रुपयांची मदत म्हणजे उपकार नाही. परभणीतील झरी गावात युवराज मुधवर या 14 वर्षीय मुलाने नवीन कपडे घेता येत नसल्याने त्यांने आत्महत्या केलीये. शेतकऱ्यांच्या मुलांच्या गरजा पूर्ण करता येत नसतील, तर त्यांच्या कुटुंबांची परिस्थिती किती गंभीर असेल, याकडे ठाकरेंनी लक्ष वेधलं.

मतचोरी आणि आंदोलकांवरील पोलिसी कारवाईच्या मुद्द्यावरूनही उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. लोकशाहीतील मतदानाचा अधिकार हिरावला जात असल्याची भावना निर्माण झाली, तर नागरिकांनी आवाज उठवायचा नाही का? जंतरमंतरवरील आंदोलनाचा संदर्भ देत ठाकरेंनी तरुण-तरुणींवर झालेल्या लाठीमाराचा आणि पोलिसांकडून झालेल्या मारहाणीचा उल्लेख केला. नीट परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या तरुणांच्या संतापामागे इतर आर्थिक आणि सामाजिक प्रश्नही असल्याचं ते म्हणाले. नोटबंदीमुळे व्यवसाय उद्ध्वस्त झाल्याचं एका आंदोलकाने सांगितल्याचा अनुभव त्यांनी मांडला. मतचोरीच्या मुद्द्यावरून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं आवश्यक असल्याचं सांगत, अन्यायाविरुद्ध संताप व्यक्त न करणाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊ नये, असं उद्धव ठाकरे म्हणाले.