'%$#खोर, सा& माणूस.. बाथरूममध्ये जाऊन गुपचूप खातोस, तुझी औकात काय?', रामदास कदम जरांगेंवर संतापले

रामदास कदम यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करत एकनाथ शिंदे यांच्याबाबतच्या कथित 500 कोटींच्या आरोपांवर पुरावे सादर करण्याचं आव्हान दिलं आहे. यावेळी त्यांनी जरांगेंवर अत्यंत जहरी टीका केली.

ADVERTISEMENT

shinde shiv sena leader ramdas kadam warning manoj jarange eknath shinde 500 crore controversy
रामदास कदमांची मनोज जरांगेवर टीका
Google CTA

मुंबई: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील वाद आता अधिकच तीव्र होताना दिसत आहे. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी जरांगे पाटील यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली आहे. एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या कथित आरोपांवरून कदम यांनी जरांगेंना थेट इशारा दिला. ‘एकनाथ शिंदे साहेबांना उद्ध्वस्त करायला निघालात, तर हा मराठा समाज तुम्हाला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही,’ असं वक्तव्य त्यांनी केलं.

मनोज जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत 500 कोटी रुपयांचा उल्लेख करून आरोप केल्याचा संदर्भ देत रामदास कदम यांनी त्यांना पुरावे सादर करण्याचं आव्हान दिलं. 

रामदास कदमांची जरांगेंवर  जहरी टीका

'आता हे बघा एक.. जरांगे पाटील.. जरांगेंना एक गोष्ट सांगतो मी इथे.. आम्ही कधी विरोधात बोललो नाही. ठीक समाजाला न्याय देण्यासाठी उपोषणाला बसतोय.. अमूक आहे, तमूक आहे. आम्ही कधी बोललो नाही. पण जरांगे तुम्ही आता जे बोललात.. एकनाथ शिंदेंबाबत, 500 कोटींबाबत.. एक गोष्ट मी आपल्याला सांगतोय.'

हे ही वाचा>> "लॉरेन्स बिश्नोई अस्तित्वात नाही, अमित शाह हेच लॉरेन्स बिश्नोई आहेत", संजय राऊतांचा हल्लाबोल

'तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना उद्ध्वस्त करायला निघाला आहात तर हा मराठा समाज तुम्हाला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. हे मी सांगायला आलोय जरांगे-पाटील.'

'अरे कोण आहेस तू?, अरे उपोषणाला बसतो आणि त्या बाथरूममध्ये जाऊन गपचूप खातोस, गपचूप खातो.. सगळ्यांना फसवतो. शिंदे साहेब माझी विनंती आहे. लावा याची चौकशी.. हा मराठ्यांचा नेता झाल्यापासून.. याची संपत्ती कुठे-कुठे आहे, कुणाच्या नावावर आहे, कुठल्या नातेवाईकांच्या नावावर संपत्ती आहे.. लावा चौकशी याची. एकदा दूध का दूध आणि पानी का पानी होऊन जाऊ द्या.'

'अरे कुठल्या गाडीतून फिरतो तू.. या गाड्या आल्या कुठून? आणि कोणावर बोलतो तू.. शिंदे साहेबांवर बोलतो? अरे तुला अभिमान वाटला पाहिजे की, मराठा समाजाचा माणूस संबंध महाराष्ट्र ढवळून काढतोय.. मराठा समाजाला न्याय देतोय.. अरे 10 टक्के आरक्षण मराठ्यांना एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं.'

'अरे बेईमान माणसा.. बेईमान माणूस तू.. %$#खोर, सा& माणूस तू.. कोणावर बोलतोय.. याद राख.. एकनाथ शिंदे साहेबांवर बोलशील.. आणि 500 कोटी. अरे बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल.'

'दाखव... कोणी दिले 500 कोटी, कुठे दिले, कुठली गाडी होती. कोणी मोजले.. कुठे गेले.. दाखव ना. तू खुल्ला बदनाम करतो.. कोणाची सुपारी घेऊन? एक सांगतोय.. आज सांगतो शेवटचं. एकनाथ शिंदे आमचं दैवत आहे. शिवसैनिकांचं दैवत आहे, मराठा समाजाचं दैवत आहे. त्यांच्याबाबतीत बोलशील तर महाराष्ट्र खपवून घेणार नाही. मराठा समाज खपवून घेणार नाही.'

हे ही वाचा>> भाजपच्या दबावाने कार्यकर्त्याचा अर्ज माघारी, शिंदेंमध्ये मुख्यमंत्री होण्याचे गट्स तरी आहेत का? सुषमा अंधारेंचा सवाल

'अरे जरांगे तुला माहितीए का.. मराठा समाजाचा पहिला मेळावा संभाजीनगरला कोणी काढला? तेव्हा तू कुठे झोपला होता? आता भाषा काय त्याची?' 

'अरे हा स्वत:ला संबंध जगाचा मालक समजतो.. पंतप्रधानांना एकेरी नावाने बोलणार, मुख्यमंत्र्यांना एकेरी नावाने बोलणार.. एकनाथ शिंदेंना एकेरी नावाने बोलणार. अरे तू आहेस कोण? अरे तू काय जगाचा मालक आहे?'

'ही मराठा समाजाची संस्कृती आहे का? तुझी औकात काय? समाजाने तुला समाजाला न्याय देण्यासाठी पाठिंबा दिला. त्याचा गैरफायदा घेतो का तू?'

'अहो ज्या गावात याचं उपोषण सुरू होतं.. त्या गाववाल्यांनी याला तिथून हाकलून दिलंय.. चल निघ इथून..'

'म्हणून आमच्या नादाला लागू नको.. अरे शिंदे, कदम, भोसले हे सगळे मराठा आहेत.. आम्ही लाचार नाही तुझ्यासारखे. लाचार नाही. कोणावर आरोप केला तू?'

'एकनाथ शिंदे हे दोन-दोन हाताने देणारे आहेत.. कुणाकडून घेणारे नाहीत. कुणाचे वशिलेबाजी नाही. सुपारी घेऊन त्यांना बदनाम करायला निघाला का रे? याद राख भविष्यात लक्षात ठेव.. गाठ आम्हा शिवसैनिकांशी आहे.' 

'एका मराठा समाजाच्या नेतृत्वाला संपविण्याचा प्रयत्न केला तर हा मराठा समाज तुला कायमचा संपवल्याशिवाय राहणार नाही.' अशी अत्यंत जहरी टीका करत रामदास कदमांनी जरांगेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

‘शिंदेंच्या नेतृत्वाखाली 232 आमदार निवडून आले’

दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री पदावरून देखील रामदास कदमांनी भाष्य केलं. ते म्हणाले, 'महाराष्ट्र विधानसभा निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच लढवण्यात आल्या. त्यावेळी राज्यातील जनतेने युतीचे 232 आमदार निवडून दिले, मग शिंदे यांची राजकीय ताकद कमी कशी होऊ शकते. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार एकनाथ शिंदेच होते, मात्र पुढे नेमकं काय घडलं, हे आपल्याला माहीत नसून शिंदे यांनाच माहिती असेल', असंही कदम म्हणाले.