"लॉरेन्स बिश्नोई अस्तित्वात नाही, अमित शाह हेच लॉरेन्स बिश्नोई आहेत", संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut on Lawrence Bishnoi : "लॉरेन्स बिश्नोई अस्तित्वात नाही, अमित शाह हेच लॉरेन्स बिश्नोई आहेत", संजय राऊतांचा दसरा मेळाव्यातून हल्लाबोल
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
"लॉरेन्स बिश्नोई अस्तित्वात नाही, अमित शाह हेच लॉरेन्स बिश्नोई आहेत"
संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut on Lawrence Bishnoi : "शिवसेना एकच आहे, ती बाळासाहेब ठाकरेंची आहे. समोर दिसतोय तो टिकाऊ माल आहे. विकाऊ माल तिकडे (शिंदेंचा मेळावा) आहे. शिंदेंचा मेळावा म्हणजे अमित शाहांचा दांडिया आहे. महाराष्ट्र धर्म आमच्याकडे आहे. तिकडे कसलाही विचार नाही. संघर्ष नाही. सुषमा अंधारेंचे भाषण जोरदार झालं. आपल्याला मुंबईतील अंडरवर्ल्डविषयी माहिती आहे. लहानपणापासून इथेच वाढलोय. त्यामुळे कोण-कधी कुठे हत्यार काढेल आणि कुठे चालवले याची आम्हालाही माहिती असते. लॉरेन्स बिश्नोई कुठे आहे? लॉरेन्स बिश्नोई अस्तित्वात नाही. अमित शाह हेच लॉरेन्स बिश्नोई आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी ज्यांच्यावर आहेत ते माफिया आहेत. ते गुंड आणि माफियांची टोळी अमित शाह चालवत आहेत. त्यामुळे आम्हाला रेजीम चेंज करायचं आहे", असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले. ते ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, भले-भले आले आणि गेले. स्टेजवरची आणि समोरची गर्दी कमी झालेली नाही. आज शस्त्र पुजेमध्ये धनुष्यबाण नसेल..पण पुढील दसऱ्याला तो इथं असेल.. देशामध्ये जेन-झी जमाना आहे. त्यांची लाट आहे. त्याचं नेतृत्व आपले आदित्य ठाकरे सुद्धा करत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलने गेल्या दशकभरात तरुणांना मुर्ख बनवलं. नरेंद्र मोदींनी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी मुहूर्त काढला होता. राम मंदिराची उभारणी झाली. पण मुहूर्त चुकला. राम मंदिर लुटलं गेलं. दान-पेट्यांवर दरोडे पडले. मोदी तुमचा मुहूर्त चुकला. ज्या अयोध्येसाठी बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वात आंदोलनात सहभागी झालो. शिवसैनिकांनी रक्त सांडलं. त्याच राम मंदिरात भाजपवाल्यांनी चोऱ्या केल्या. श्रीरामाचे अलंकार चोरले.
अमित शाह राहातात ते रस्ते दोन लाख सैन्यांनी व्यापून टाकलाय. पंतप्रधान अंडरग्राऊंड आहेत. जनतेने बंड केलंय, जनता रस्त्यावर उतरलीये म्हणून लोकं घाबरलेत. Albania नावाच्या देशात लोकांनी सुप्रीम कोर्ट जाळलं. तिकडच्या भ्रष्ट पंतप्रधानाच्या पाठिशी कोर्ट उभारलं म्हणून लोकांनी कोर्ट जाळून टाकलं. आता मोदी शाहांना लोकं घाबरत नाहीत. मोदी-शाहांना लोकांना घाबरु लागलेत, असंही संजय राऊतांनी सांगितलं.
