हल्लेखोरांच्या टार्गेटवर होते बॉलिवूडचे मोठे सेलिब्रिटी, पण टायगरवर का झाडल्या गोळ्या?

टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या प्रकरणात हल्लेखोरांचं मूळ टार्गेट बॉलिवूडमधील दुसरा मोठा सेलिब्रिटी असल्याचं समोर आलं आहे. सोशल मीडिया पोस्टमधून टायगर श्रॉफच्या दिनक्रमाची माहिती मिळाल्यानंतर हल्लेखोरांनी प्लॅन बदलल्याचं सांगितलं जात आहे.

ADVERTISEMENT

MumbaiTak
Google CTA

मुंबई: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणात एक महत्त्वाची माहिती समोर आल्याचा दावा केला जात आहे. सुरुवातीला टायगर श्रॉफ हा हल्लेखोरांच्या निशाण्यावर नव्हता, तर बॉलिवूडमधील अन्य एका मोठ्या सेलिब्रिटीवर हल्ला करण्याचा त्यांचा कट होता. मात्र, मुंबईत आल्यानंतर त्या सेलिब्रिटीला लक्ष्य करण्यात अपयश आल्याने हल्लेखोरांनी आपला प्लॅन बदलल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्यांनी टायगर श्रॉफला लक्ष्य केलं.

या प्रकरणामुळे बॉलिवूडमधील सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सोशल मीडिया पोस्ट आणि फॅन पेजच्या माध्यमातून टायगर श्रॉफ यांच्या दिनक्रमाची माहिती मिळवून हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला करण्याची योजना आखल्याचं सांगितलं जात आहे.

टायगर श्रॉफ नव्हता हल्लेखोरांचा पहिलं टार्गेट

समोर आलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर सुरुवातीला बॉलिवूडमधील दुसऱ्याच एका मोठ्या सेलिब्रिटीवर हल्ला करण्याच्या तयारीत होते. मात्र, मुंबईत आल्यानंतर त्यांना त्या सेलिब्रिटीपर्यंत पोहोचण्यात किंवा त्याला लक्ष्य करण्यात यश आलं नाही. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या सेलिब्रिटीला लक्ष्य करण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणात संबंधित दुसरा सेलिब्रिटी नेमका कोण होता, याची माहिती समोर आलेली नाही. 

सोशल मीडिया पोस्टमधून मिळाली टायगर श्रॉफ यांच्या दिनक्रमाची माहिती?

टायगर श्रॉफला लक्ष्य करण्यामागे सोशल मीडियाचा वापर झाल्याचा दावा केला जात आहे. फॅन पोस्ट्स आणि इन्स्टाग्रामवरील फॅन पेजच्या माध्यमातून टायगर श्रॉफ दर रविवारी जुहू येथील फुटबॉल ग्राउंडवर जात असल्याची माहिती हल्लेखोरांना मिळाल्याचं सांगितलं जात आहे.

हे ही वाचा>> टायगर श्रॉफवर गोळ्या झाडणारे तिघे 15 मिनिटात कसे सापडले?, पोलिसांनी दिल्ली धक्कादायक माहिती

टायगर श्रॉफ फुटबॉल खेळण्यासाठी किंवा सरावासाठी या मैदानावर जात असत, अशी माहिती त्याच्या चाहत्यांच्या पोस्टमधून समोर आली असावी, असा दावा केला जात आहे. या ठिकाणी त्याची सुरक्षा तुलनेने कमी असल्याचं हल्लेखोरांच्या लक्षात आल्याने त्यांनी टायगर श्रॉफला लक्ष्य करण्याचा निर्णय घेतला.

टायगर श्रॉफ सार्वजनिक ठिकाणी तुलनेने मोकळेपणाने वावरत असल्याने त्याच्यावर हल्ला करणं सोपं जाईल, असा हल्लेखोरांचा अंदाज होता.

फुटबॉल ग्राउंडबाहेर गाडीवर गोळीबार

समोर आलेल्या माहितीनुसार, टायगर श्रॉफ जुहू येथील फुटबॉल ग्राउंडमधून बाहेर पडत असताना त्याच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात टायगर श्रॉफला किरकोळ दुखापत झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, त्याचा ड्रायव्हर आणि अन्य एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा>> टायगर श्रॉफवर गोळीबार, 15 तासांत शुटर कोटा येथे कसे पोहोचले?

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. सेलिब्रिटींच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला असल्याचा संशय या प्रकरणामुळे व्यक्त केला जात आहे.

ड्रायव्हरला गोळी लागल्यानंतर टायगर श्रॉफने दाखवली प्रसंगावधानता

गोळीबारात ड्रायव्हर जखमी झाल्यानंतर टायगर श्रॉफ यांनी प्रसंगावधान राखल्याचा दावा केला जात आहे. ड्रायव्हरला गोळी लागल्यानंतर त्यांनी स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसून गाडी रुग्णालयाच्या दिशेने नेली आणि जखमी ड्रायव्हरला उपचारांसाठी दाखल केलं.

बॉलिवूड सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

टायगर श्रॉफवरील हल्ल्याच्या प्रकरणात सुरुवातीचं टार्गेट दुसरा सेलिब्रिटी असल्याचा दावा खरा ठरल्यास, बॉलिवूडमधील प्रसिद्ध व्यक्तींच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात. सोशल मीडियावरून सेलिब्रिटींच्या दिनक्रमाची माहिती सहज उपलब्ध होत असल्याने त्याचा गैरवापर होण्याची शक्यताही या प्रकरणातून अधोरेखित होते.

मात्र, हल्लेखोरांचा मूळ उद्देश काय होता, दुसरा सेलिब्रिटी कोण होता आणि टायगर श्रॉफ यांना लक्ष्य करण्याचा निर्णय नेमका कसा घेतला गेला, याबाबत अधिकृत तपासातून स्पष्टता येणं आवश्यक आहे.