भाजपच्या दबावाने कार्यकर्त्याचा अर्ज माघारी, शिंदेंमध्ये मुख्यमंत्री होण्याचे गट्स तरी आहेत का? सुषमा अंधारेंचा सवाल
Sushma Andhare on Eknath Shinde : भाजपच्या दबावाने कार्यकर्त्याचा अर्ज माघारी, शिंदेंमध्ये मुख्यमंत्री होण्याचे गट्स तरी आहेत का? असा सवाल ठाकरेंच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदेंच्या मंत्र्यांना केलाय..
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भाजपच्या दबावाने कार्यकर्त्याचा अर्ज माघारी
शिंदेंमध्ये मुख्यमंत्री होण्याचे गट्स तरी आहेत का? सुषमा अंधारेंचा सवाल
Sushma Andhare on Eknath Shinde, मुंबई : "शेतकऱ्यांची झुंज जन्म-मरणाच्या प्रश्नांची सुरु आहे. शिंदे-फडणवीसांची झुंज खुर्चीसाठी सुरु आहे. एका बाजूला शिंदेंचे मंत्री सांगतात आमचे मुख्यमंत्री होणार आहेत. मात्र, तुमचे साहेब मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस कुठे जाणार? यावर चकार शब्द काढत नाहीत. त्यांच्या साहेबांमध्ये मुख्यमंत्री होण्याचे गट्स तरी आहेत काय? कारण त्यांना पुणे शिक्षक मतदारसंघाचा उमेदवाराचा (मंगेश चिवटे) अर्ज वाचवता आला नाही. भाजपचा दबाव येताच अर्ज माघारी घ्यावा लागतो. मग तुम्ही कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहू शकत नाहीत. त्यांच्याकडे काय मुख्यमंत्री होण्याचे गट्स आहेत?", असा सवाल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला. त्या ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात बोलत होत्या.
हेही वाचा : मॉडेलला पकडण्यासाठी 50 हजारांचं बक्षीस, अखेर नागपुरात सापडली, नेमकं कोणतं कांड केलं?
सुषमा अंधारे म्हणाल्या, यावेळीचा दसरा दुष्काळाच सावट घेऊन आलाय. शेतकऱ्यांची काय पद्धतीने चेष्टा केली जातेय? याबाबत कैलास पाटील यांनी भूमिका मांडली. गेल्या 150 वर्षात जो दुष्काळ नव्हता तो आता दिसतोय. माझी आजी-आजोबा 1972 दुष्काळाची आठवण करुन द्यायचे. या दुष्काळच्या पार्श्वभूमीर सॅटेलाईट द्वारे पंचनामे काढायला बघतंय. चारा छावण्यांच्या नावाखाली शेतकऱ्यांची कुचेष्टा सुरु आहे. चारा छावण्या उभ्या केल्या जातील, त्यातून शिंदे गटाचे भाजपचे एजंट दलाली सुरु करतील... आपण वेगवेगळ्या प्रश्नांशी झुंजत आहोत. मात्र, शिंदे-फडणवीसांमधील झुंज खुर्चीसाठी आहे.
