अंतरवाली गाव दत्तक घेतलं, प्रेमाचं रोप रुजवायचंय; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात काय म्हणाल्या?
Pankaja Munde dasara melava : बीडमधील सावरगाव येथे दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी जाती-धर्माच्या भिंती तोडून समाजात एकी आणि प्रेम वाढवण्याचं आवाहन केलं. समर्थकांच्या कष्टांचा आणि त्यांच्या प्रेमाचाही त्यांनी उल्लेख केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अंतरवाली गाव दत्तक घेतलं, प्रेमाचं रोप रुजवायचंय;
पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात काय म्हणाल्या?
Pankaja Munde Dasara Melava Speech : बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे दसरा मेळाव्यातून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी समर्थकांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी दुष्काळाच्या परिस्थितीचा उल्लेख करत जाती-धर्माच्या भिंती तोडण्याचं आवाहन केलं. दुष्काळ हा गरीब आणि श्रीमंत असा भेद करून येत नाही. उन्हाचा त्रास, तहान आणि जनावरांच्या चारा-पाण्याची गरज ही सर्वांसाठी सारखीच असते, असं त्या म्हणाल्या. संकटाच्या काळात जातीय भेद बाजूला पडतात. त्यामुळे दुष्काळाच्या परिस्थितीत जाती-धर्माच्या भिंती तोडून माणसांमध्ये एकी निर्माण करण्याची गरज आहे, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.
आपण जालन्यातील अंतरवाली गाव दत्तक घेतलं असून त्या गावाचा विकास करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. बीड जिल्ह्यातील प्रत्येक गावावर जसं प्रेम करते, तसंच प्रेम अंतरवाली गावावरही करणार असल्याचं त्या म्हणाल्या. आपल्याला गावागावात प्रेमाचा प्रसार करायचा आहे आणि प्रेमाचं रोप रुजवायचं आहे, असं पंकजा मुंडे यांनी नमूद केलं.
हेही वाचा : ‘घँऽऽ घँऽऽ’...,दुचाकीचा आवाज अन् गोकुळ जिंकताच कोल्हापूर स्टाईलने जल्लोष; पाहा व्हिडीओ
पंकजा मुंडे म्हणाल्या, जातीपातीच्या आधारावर राजकारण करून मोठं होऊ पाहणाऱ्या नेत्यांना भविष्य नाही. प्रशिक्षित आणि हुशार माणूसच नेतृत्व करू शकतो आणि देशाला जागतिक महासत्ता बनवण्याची क्षमता त्याच्यात असते. योग्य विचार आणि स्पष्ट दिशा नसलेला माणूस समाजाला योग्य दिशा देऊ शकत नाही, तर तो समाजाला विषारी आणि विकृत दिशा देऊ शकतो. यावेळी त्यांनी मेळाव्याला उपस्थित असलेल्या समर्थकांच्या गर्दीचा उल्लेख केला. त्यांचे समर्थक दहा-दहा किलोमीटर चालत मेळाव्यासाठी आल्याचं त्यांनी सांगितलं. कडक उन्हातही लोक घरून दशम्या आणि पाणी घेऊन आले. दुष्काळाची परिस्थिती असतानाही समर्थकांनी मेळाव्याला हजेरी लावली, याबद्दल त्यांनी आभार मानले. समर्थकांचं हे प्रेम पाहता त्यांच्यासाठी स्वतःचा श्वासही कमी पडेल, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. मनात स्वार्थ असता तर इतक्या उन्हात लोक आले असते का? असा सवालही त्यांनी केला.
हेही वाचा : 'मंत्र्यांच्या मुलाचा पराभव केला', बंटी पाटील समर्थकांच्या सडेतोड प्रतिक्रिया
दुष्काळाच्या काळात समाजामध्ये अनेक भिंती निर्माण झाल्या आहेत. मात्र, या भिंती मोडून काढण्याची गरज आहे. उजेड आणि अंधार यांच्यात भिंत उभी करावी, पण माणसामाणसांत भिंत निर्माण करू नये. धर्माच्या तर नाहीच, पण जातीच्या भिंतीही मोडून काढल्या पाहिजेत. दुष्काळाच्या मेळाव्याबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. अशा परिस्थितीत मेळावा कसा होणार, अशी विचारणा माध्यमांकडूनही करण्यात आली होती. मात्र, आपण विजय मिळवण्याची जिद्द ठेवली असून अडचणींचा सामना करण्याची तयारी असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. कोणताही निर्णय घेताना आपण पुढचा विचार केला नाही, असं सांगत त्यांनी भगवान गडावरून भगवान भक्ती गडाची स्थापना केल्याचा उल्लेख केला. एका क्षणात आणि एका ट्वीटवर समर्थक इथे आले, यामागे एकीची शक्ती असल्याचं त्या म्हणाल्या.
पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांची तुलना मधमाशांच्या पोळ्याशी केली. एखाद्या कुत्र्याला दगड मारला तर तो केकाटतो; मात्र मधाच्या पोळ्याला दगड मारल्यास त्याचे परिणाम वेगळे होतात, असं उदाहरण त्यांनी दिलं. मधमाशा जशा कष्ट करतात, त्याचप्रमाणे आपले समर्थकही उन्हातान्हात कष्ट करतात आणि स्वाभिमानाने जीवन जगतात, असं त्या म्हणाल्या. या लोकांच्या कष्टाचं चीज व्हावं, यासाठी आपलं जीवन समर्थकांसाठी वाहून टाकण्याची तयारी असल्याचं त्यांनी सांगितलं. मेळाव्याला उपस्थित असलेले लोक माध्यमांवर आणि रील्स पाहण्यात सक्रिय असतानाही मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याचा उल्लेख त्यांनी केला. समर्थकांच्या एकीवर, कष्टांवर आणि त्यांच्यावरील प्रेमावर भर देत पंकजा मुंडे यांनी भाषणातून जाती-धर्माच्या भिंती तोडण्याचा आणि समाजात प्रेम वाढवण्याचा संदेश दिला.
