'आई, कॉलेजला जाते..' प्रियकराच्या फ्लॅटमध्ये कुजलेल्या अवस्थेत तरुणीचा मृतदेह, काय घडलं?

मुंबई तक

वाराणसीमध्ये आपल्या प्रियकराच्या भाड्याच्या खोलीतील बाथरूममध्ये एमएससी (MSc) करणाऱ्या एका विद्यार्थिनीचा मृतदेह आढळून आला. ती काही काळापासून बेपत्ता होती. या प्रकरणात तिच्या कुटुंबीयांनी ज्या व्यक्तीचे नाव घेतले आहे, तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चार पथके तयार केली आहेत.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

आई, कॉलेजला जाते..

point

प्रियकराच्या फ्लॅटमध्ये कुजलेल्या अवस्थेत तरुणीचा मृतदेह

point

काय घडलं?

Crime News : गेल्या तीन दिवसांपासून संशयास्पदरीत्या बेपत्ता असलेल्या एका एम.एससी.च्या विद्यार्थिनीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. तिच्या प्रियकराच्या भाड्याच्या खोलीतील बाथरुममध्ये कुजलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. 18 ऑगस्ट रोजी कॉलेजला जाते म्हणून घरातून निघालेली ही 22 वर्षीय तरुणी रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने तिच्या पालकांनी तिचा शोध सुरू केला होता. या प्रकरणी पोलिसांनी मोबाईल सर्व्हिलन्सद्वारे तपास केला असता तिचे शेवटचे लोकेशन एका कॉलेजजवळ असल्याचे समोर आले होते. उत्तर प्रदेशातील वाराणसीतील ही घटना आहे.

मामाच्या घरी सापडली चावी

मुलगी बेपत्ता असल्यामुळे तिचे कुटुंब स्वतःच तिचा शोध घेत होते. यादरम्यान तिच्या आईला आणि चुलत भावाला माहिती मिळाली की तिचा ओळखीचा आणि चोलापूर येथील रहिवासी असलेला विवेक चौबे हा तरुणदेखील गायब आहे. शोधमोहिमेदरम्यान विवेकच्या मामाच्या घरी एका पिशवीत त्याच्या भाड्याच्या खोलीची चावी सापडली.

हे ही वाचा : मुंबई : नजर काढण्याच्या बहाण्याने घरात शिरला, बहुरुपी तृतीयपंथीयाचा महिलेवर लैंगिक अत्याचार

बाथरुममध्ये काय दिसलं?

तरुणीच्या आईने ती चावी घेऊन विवेकच्या भाड्याच्या खोलीवर जाऊन कुलूप उघडले. घरात प्रवेश करताच प्रचंड दुर्गंधी येत असल्याने त्यांनी बाथरुममध्ये जाऊन पाहिले असता, तेथे त्यांच्या मुलीचा कुजलेला मृतदेह आढळून आला. तरुणीच्या वडिलांनी तिच्या लग्नाचे नियोजन शेजारच्या गावातील एका तरुणाशी केले होते, याच कारणावरून विवेकने तिची हत्या करून मृतदेह बाथरुममध्ये लपवला आणि तिथून पळ काढला, असा गंभीर आरोप तिच्या कुटुंबाने केला आहे.

हे ही वाचा : खासदारपुत्राच्या भरधाव कारने तरुणीला चिरडले, तरीही अटक नाहीच; नेमकं कारण काय?

नातेवाईक आरोपी फरार

घटनास्थळी पोहोचलेल्या स्थानिक पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मृत तरुणीचा मृतदेह ज्या खोलीत आढळला ती खोली विवेक चौबेने भाड्याने घेतली होती आणि तो तरुणीच्या कुटुंबाचा नातेवाईकदेखील आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विवेक चौबेचा शोध घेण्यासाठी चार विशेष पथके तयार केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.