तीव्र कमी दाबाचं क्षेत्र कुठे पोहोचलं? महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?
maharashtra rain low pressure area : बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता मध्य प्रदेशात पोहोचले आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील काही भागांवर होण्याची शक्यता असून, विदर्भात 23 ऑगस्टला अनेक ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
तीव्र कमी दाबाचं क्षेत्र कुठे पोहोचलं?
महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?
Maharashtra rain low pressure area : महाराष्ट्रातील पावसाची स्थिती सध्या काहीशी शांत आहे. गेल्या 48 तासांत राज्यात फारसा पाऊस झालेला नाही. मात्र बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता पुढे सरकत मध्य प्रदेशात पोहोचले आहे. या हवामान प्रणालीचा परिणाम मध्य प्रदेशासोबतच आसपासच्या राज्यांमध्येही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काही भागांत हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. सध्या नैऋत्य मोसमी वारे सक्रिय असले तरी त्यांचा वेग फारसा नाही. तसेच अरबी समुद्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेले नसल्याने महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाची स्थिती दिसत नाही.
हेही वाचा : नऊ वर्षांच्या मुलीवर भावासमोर लैंगिक अत्याचार, अखेर कुटुंबीयांना सांगितला घटनेचा थरार
‘फेअरली वाईड स्प्रेड टू वाईड स्प्रेड रेनफॉल’
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भात 20 ते 22 ऑगस्टदरम्यान काही ठिकाणी तुरळक ते विखुरलेला पाऊस होण्याची शक्यता आहे. 24 आणि 25 ऑगस्टलाही अशीच परिस्थिती राहण्याचा अंदाज आहे. मात्र 23 ऑगस्ट हा दिवस विदर्भासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. या दिवशी विदर्भात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याला ‘फेअरली वाईड स्प्रेड टू वाईड स्प्रेड रेनफॉल’ असा अंदाज देण्यात आला आहे. म्हणजेच विदर्भातील अनेक भागांत पाऊस होण्याची शक्यता आहे. याआधी 20 आणि 21 ऑगस्टला काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी पडू शकतात. मात्र हा अतिमुसळधार पावसाचा इशारा नाही.
हेही वाचा : शिंदेंच्या हातून धनुष्यबाण सुटणार की राहणार? सुप्रीम कोर्टातील सुनावणी जशीच्या तशी
