कावड यात्रेत डिजेला करंट लागून मुलाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी
Crime News : कावड यात्रेत डिजे लावला असताना, त्याचा करंट लागून एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या गंभीर घटनेदरम्यान दुसरी व्यक्ती गंभीररित्या जखमी झाली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाल्याचं चित्र आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कावड यात्रेत डिजेला करंट लागून मुलाचा मृत्यू
एकजण गंभीर जखमी
Crime News : उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे रविवारी 9 वाजण्याच्या सुमारास एक कावड यात्रा सुरू होती. त्याच कावड यात्रेत डिजे लावला असताना, त्यालाचा करंट लागून एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या गंभीर घटनेदरम्यान दुसरी व्यक्ती गंभीररित्या जखमी झाली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाल्याचं चित्र आहे.
हे ही वाचा : 8 वीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीवर अत्याचार, घटनास्थळी आई पोहोचली..
कावड यात्रेत डिजेला करंट लागून मुलाचा मृत्यू
धार्मिक यात्रेनिमित्त कावड यात्रा सुरू होती, तेव्हा डीजेला मोठा करंट लागला होता. त्याच डिजेच्या संपर्कात दोन तरुण आल्याने त्यापैकी एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृताची ओळख करन चौहान अशी झाली. याच करंटच्या संपर्कात दुसरा मुलगा मोहन भारती देखील आला होता, मात्र तो कसाबसा वाचला. या घटनेनं परिसर हादरून गेला.
एकजण गंभीर जखमी
संबंधित प्रकरणात कावड यात्रेत इतरही लोक उपस्थित होते. त्यांनी पीडित मुलांना जवळच्या रुग्णालयात नेले होते. तेव्हा करन चौहानला मृत घोषित केले होते, तर दुसरीकडे मोहन भारती हा गंभीर जखमी झाला होता, त्याच्यावर उपचार करण्यात आले होते.
कावड यात्रेदरम्यान डिजेबाबत आता मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे. धार्मिक यात्रेदरम्यान डीजे हा विजेच्या साधनांच्या संपर्कात येण्याबाबत सावधानता बाळगावी, मात्र तसं न झाल्याने या हलगर्जीपणामुळे ही दुर्दैवी घटना घडली.
