बीड जिल्हा रुग्णालयात निष्काळजीपणा, सिझेरियननंतर महिलेच्या पोटात हातमोजे आणि रुमाल

मुंबई तक

Beed crime news : बीड जिल्हा रुग्णालयात निष्काळजीपणाचा कहर करण्यात आलेला आहे. सिझेरियननंतर महिलेच्या पोटातच हातमोजे आणि रुमाल आढळून आल्याचा लज्जास्पद प्रकार उघडकीस आला. या घटनेत महिलेचे दोन वेळा सिझेरियन करून हातमोजे आणि रुमाल काढण्यात आला.

ADVERTISEMENT

Beed crime news
Beed crime news
Google CTA

बातम्या हायलाइट

point

बीड जिल्हा रुग्णालयात निष्काळजीपणाचा कहर

point

महिलेच्या सिझेरियननंतर हातमोजे आणि रुमाल पोटातच

point

पीडितेच्या पोटातील गर्भाशय काढलं

Beed Crime News : योगेश काशिद - बीड जिल्हा रुग्णालयात निष्काळजीपणाचा कहर करण्यात आलेला आहे. महिलेच्या सिझेरियननंतर हातमोजे आणि रुमाल पोटातच आढळून आल्याचा लज्जास्पद प्रकार उघडकीस आला. या घटनेत महिलेचे दोन वेळा सिझेरियन करून हातमोजे आणि रुमाल काढण्यात आला. पीडित महिलेचे नाव संध्या गायकवाड (वय 19) असे आहे. या घटनेनंतर पीडितेला बीडच्या रुग्णालयात नेले असता, त्यांच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. 

हे ही वाचा : बाप-लेकीच्या नात्याला काळिमा! वडिलांनी लेकीला दोन वेळा केलं प्रेग्नंट, पाप लपवण्यासाठी भयंकर कांड

पीडितेच्या पोटातील गर्भाशय काढलं

अशातच सामाजिक कार्यकर्ते बाबुराव पोटभरे यांनी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडे खाजगी रुग्णालयात पाठवून सिंदिकेट चालवले जात असल्याचा आरोप केला. दरम्यान पुण्याच्या ससून रुग्णालयात पीडितेला नेण्यात आले असता, महिलेची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याची माहिती समोर आली. पोटातील साहित्य काढण्यात आले तेव्हा तिच्या पोटातील गर्भाशय देखील काढण्यात आल्याची माहिती समोर आली. 

डॉक्टरांवर निलंबन कारवाईची मागणी 

या प्रकरणात कुटुंबीयांनी आरोप केला की, "माझ्या मुलीचे पहिल्यांदा आई झाली, मात्र तिला तिचे मुल घेता येत नाहीये. तिच्यावर आलेली ही वेळ डॉक्टरांमुळे आली. अशा डॉक्टरांना निलंबित करावं", अशी मागणी आईने केली आहे. दरम्यान आईच्या मागणीवरून संबंधित डॉक्टरांवर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

हे ही वाचा : Whatsapp वर स्टेट्‍स ठेवून दुहेरी हत्याकांड, नंतर स्वत:वर गोळीबार

या घटनेची गांभीर्याने दखल घेत बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीशकुमार सोळंके यांनी तातडीने पुणे गाठून पीडित महिला व तिच्या नातेवाईकांची भेट घेतली. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी लातूर उपसंचालक कार्यालयाचे विशेष पथक बीडमध्ये दाखल झाले असून दोषींवर कडक कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.