Whatsapp वर स्टेट्‍स ठेवून दुहेरी हत्याकांड, नंतर स्वत:वर गोळीबार

मुंबई तक

Crime News : दुहेरी हत्याकांडाचे हादरून टाकणारे प्रकरण उघडकीस आलेले आहे. बँक अधिकारी पत्नी दिव्या मिश्रा आणि सख्ख्या बहिणीची हत्या करत स्वत: देखील जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

Whats App वर स्टेट्‍स ठेवून तिहेरी हत्याकांड 

point

बहीण, बायको आणि मुलाला संपवलं 

Crime News : उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊच्या गोमनीगरहून खळबळजनक प्रकार उघडकीस आलाय. ट्रिपल मर्डरच्या हत्या-आत्महत्या प्रकरणात हादरून टाकणारी घटना घडली आहे. बँक अधिकारी पत्नी दिव्या मिश्रा आणि सख्ख्या बहिणीची हत्या करत स्वत: देखील जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार आहे. आरोपीने व्हॉट्सॲप स्टेट्‍स देखील ठेवले होते, ज्यात हत्येविषयी लिहिण्यात आले होते, यामुळे हे प्रकरण उघडकीस आले. 

हे ही वाचा : पिंपरी-चिचवडमध्ये महिलेनं तोडला रेड सिग्नल, कारच्या धडकेत कोसळली; Video व्हायरल

व्हॉट्सॲपवर स्टेट्‍स ठेवून तिहेरी हत्याकांड 

संबंधित प्रकरणातील आरोपीची ओळख मानस अशी समोर आली. सोशल मीडियावर आरोपी मानसने खूनाची कबुली दिली. गुन्हा कबुल करत गंभीर आरोप केले, नंतर क्रूरकृत्य त्यात नमूद केले होते. आरोपी मानस वाजपेयीने आपल्या व्हॉट्सॲपवर स्टेट्‍स ठेवला होता. त्यावर त्याने नमूद केले की, आज पत्नीचा खून केला, कारण तिने मला धोका दिला होता. आता मला माझ्या बहिणीची हत्या करायची आहे. या मथळ्याने स्पष्ट होते की, आरोपीने अगदी थंड डोक्याने कट रचला होता. तिने केवळ पत्नीचीच हत्येचे समर्थन केले नाही,तर तो आपल्या बहिणीला मारून आत्महत्या करणार असल्याचे सूचित केले.

बहीण, बायको आणि मुलाला संपवलं 

मानसच्या स्टेट्‍सनंतर घडलेल्या घटना त्याने लिहिण्याप्रमाणेच घडल्यात. दरम्यान, गुरूवारी मानस दोन पिस्तूल घेऊन गोमतीनगर मधील आयसीआयसीमधील बँकेत पोहोचला होता. त्याने पत्नी दिव्या मिश्रा हिला बोलावले. दिव्या मिश्रा दिसताच त्याने तिच्यावर गोळीबार केला. अशातच उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. बँकेबाहेर गोळीबार केल्यानंतर आरोपी हा त्याच्या घरी पोहोचला. त्याने त्याच्या स्टेट्समध्ये नमूद केल्याप्रकरणी दुसरा टप्पा पार पडला, नंतर बहिणीवर गोळीबार केला. नंतर त्याने स्वत:वर गोळीबार केला आणि जीवन संपवलं. 

हे ही वाचा : मुंबईत सुनेला संपवण्यासाठी सासूनं मोलकरणीला 3 लाखांची दिली सुपारी अन्...

गोमतीनगर पोलिसांनी फॉरेन्सिक पथकाने व्हॉट्सॲप स्टेट्‍स कॉल डिटेल्स आणि सीसीटीव्हे फुटेजला त्यांच्या तपासासाठी केंद्रस्थानी ठेवण्यात आले होते. याचा एकूण तपास आता पोलीस करत आहेत.