पिंपरी-चिचवडमध्ये महिलेनं तोडला रेड सिग्नल, कारच्या धडकेत कोसळली; Video व्हायरल
Pune News : पुण्यात काही दिवसांपासून अपघाताच्या घटनेत सातत्याने वाढ होऊ लागली आहे. पिंपरी-चिचवडमध्ये एका महिलेनं वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याची घटना आहे. याचाच तिला परिणाम भोगावा लागला आहे. मोरेवाडी चौका रेड सिग्नल सुरू असताना महिला ही थेट दुचाकी घेऊन पुढे निघाली होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पुण्यात काही दिवसांपासून अपघाताच्या घटनेत सातत्याने वाढ
पिंपरी-चिचवडमध्ये महिलेनं तोडला सिग्नल
व्हिडिओ व्हायरल
Pune News : कृष्णा पांचाळ - पुण्यात काही दिवसांपासून अपघाताच्या घटनेत सातत्याने वाढ होऊ लागली आहे. पिंपरी-चिचवडमध्ये एका महिलेनं वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याची घटना आहे. याचाच तिला परिणाम भोगावा लागला आहे. मोरेवाडी चौका रेड सिग्नल सुरू असताना महिला ही थेट दुचाकी घेऊन पुढे निघाली होती. तेव्हा दुसऱ्या बाजूचा सिग्नल सुटला आणि वेगाने आलेल्या कार चालकाला दुचाकीस्वार महिला दिसली नाही.
हे ही वाचा : Astrology : सिंह राशीतील सूर्य आणि केतूचा धोकादायक संयोग, 'या' राशींना सावध राहण्याचा इशारा
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
याचदरम्यान कारच्या धडकेत महिला रस्त्यावर कोसळलेली दिसून येते. महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला दिसून येतोय. कारच्या धडकेत महिला जरी रस्त्यावर कोसळली असली तरीही तिला गंभीर दुखापत झाली नाही. तिचे प्राण वाचले ती थोडक्यात बचावली गेली आहे.
अपघाताचा हा थरार कारच्या डॅशबोर्डच्या कॅमेऱ्यात कैद झाला. वाहतूक सिग्नल तोडण्याचा हा प्रकार किती धोकादायक असू शकतो, हे याच अपघातातून पुन्हा एकदा समोर आलंय. त्यामुळे वाहनाचालतांनी वाहतूक नियमांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आले.
हे ही वाचा : राष्ट्रीय महामार्गावर ट्रक जळून चालकाचा मृत्यू, पण पोलीस तपासात भयंकर कांड उघडकीस
दरम्यान, पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे सातत्याने अपघाताच्या घटना सुरूच आहेत. वाहतुकीचे उल्लंघन केल्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होऊ लागली आहे. तसेच याचमुळे वाहतूक कोंडींसारख्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. यामुळे वाहतुकीच्या परिस्थितीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसतोय.
