बाप-लेकीच्या नात्याला काळिमा! वडिलांनी लेकीला दोन वेळा केलं प्रेग्नंट, पाप लपवण्यासाठी भयंकर कांड
Crime News : बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलंय. अल्पवयीन मुलीवर सलग तीन वर्षे नराधम बापाने लैंगिक अत्याचार केले आणि तब्बल दोनदा गर्भवती केले होते. हा गुन्हा लपविण्यासाठी त्याने गर्भपात देखील केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नराधम बापासह इतर आरोपी अटकेत
खोटे आधारकार्ड बनवून गर्भपात
Crime News : छत्तीसगडच्या रायपूर येथून बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलंय. अल्पवयीन मुलीवर सलग तीन वर्षे नराधम बापाने लैंगिक अत्याचार केले आणि तब्बल दोनदा गर्भवती केले होते. हा गुन्हा लपविण्यासाठी त्याने गर्भपात देखील केला. संबंधित प्रकरणात आरोपी वडिलांसह आत्या आणि इतर सहा जणांना अटक करण्यात आलेली आहे.
हे ही वाचा : Whatsapp वर स्टेट्स ठेवून दुहेरी हत्याकांड, नंतर स्वत:वर गोळीबार
नराधम बापासह इतर आरोपी अटकेत
पीडित अल्पवयीन मुलीने काही महिन्यानंतर सोशल मीडियावरून आपल्या आईशी संपर्क साधला होता. नंतर आईशी घडलेला सर्व प्रकार सांगितला. आईने आपल्या भावासोबत पोलीस ठाणे गाठलं. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच, कारवाई करत 6 आरोपींना अटक करण्यात आली होती. पोलीस आरोपी वडील आणि आत्यासोबत रुग्णालयातील नर्स, सुपरवायझर, अॅम्बुलन्स चालक आणि पत्नीला अटक करण्यात आली होती.
खोटे आधारकार्ड बनवून गर्भपात
संबंधित प्रकरणात गर्भधारणा लपवण्यासाठी वडिलांनी मुलीचे खोटे आधारकार्ड बनवले होते. याचा सध्या तपास सुरू करण्यात आलेला आहे. तसेच मुलाला दत्तक घेण्यात आले असता, त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र अद्याप कायदेशीररित्या दत्तक प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.
एका वृत्तमाध्यमानुसार, पश्चिम विभागाचे डीसीपी रॉबिन्सन गु़डिया यांनी सांगितलं की, पीडितेनं माहिती दिली की, 2023 मध्ये तिचे आई-वडील विभक्त झाले. ती तिच्या वडिलांसोबतच आणि दोन लहान बहिणींसोबत राहू लागली होती. आईपासून विभक्त झाल्यानंतर तिच्या वडिलांनी तिला धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती.
