हिंगोली : बिस्किस्टाचे अमिष दाखवून 13 वर्षीय भोळसर मुलीवर सामुहिक बलात्कार, चौघांना अटक

मुंबई तक

Hingoli Rape Case : हिंगोलीच्या वसमत तालुक्यात 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बिस्किटे आणि पैशांचे आमिष दाखवून सामूहिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून, पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

ADVERTISEMENT

Hingoli Rape Case
Hingoli Rape Case
Google CTA

बातम्या हायलाइट

point

हिंगोली : 13 वर्षीय भोळसर मुलीवर सामुहिक बलात्कार

point

बिस्किस्टाचे अमिष दाखवून चौघांनी केलं घृणास्पद कृत्य

Hingoli Rape Case : हिंगोली :  हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील एका गावात 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बिस्किटे आणि पैशांचे आमिष दाखवून सामूहिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हिंगोली पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. अल्पवयीन मुलीच्या भोळसरपणाचा फायदा घेत आरोपींनी तिला बिस्किटे आणि पैशांचे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : खासदारपुत्राच्या भरधाव कारने तरुणीला चिरडले, तरीही अटक नाहीच; नेमकं कारण काय?

पीडित मुलगी मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले आहे. तिच्या भोळसरपणाचा आणि मानसिक स्थितीचा फायदा आरोपींनी घेतल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकाराची माहिती घरातील सदस्यांना उशिरा मिळाली. त्यामुळे घटनेनंतर काही काळाने हा प्रकार समोर आला.  अत्याचारामुळे पीडित मुलीची प्रकृती खालावली आहे. तिला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

हेही वाचा : मुंबई : नजर काढण्याच्या बहाण्याने घरात शिरला, बहुरुपी तृतीयपंथीयाचा महिलेवर लैंगिक अत्याचार