'आतमध्ये दारुच्या बाटल्या', अल्पवयीन मुलाने बेदरकारपणे कार चालवली, 2 महिलांना चिरडलं
nalasopara news : नालासोपारा पूर्वेतील दत्तनगरमध्ये भरधाव कारने दोन महिला पादचाऱ्यांना धडक दिली. या अपघातात एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'आतमध्ये दारुच्या बाटल्या', अल्पवयीन मुलाने बेदरकारपणे कार चालवली,
2 महिलांना चिरडलं, एकीचा मृत्यू
nalasopara news : नालासोपारा पूर्वेतील दत्तनगर परिसरात बुधवारी सायंकाळी भरधाव कारने दोन महिला पादचाऱ्यांना धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली. ही घटना बुधवारी सायंकाळी सुमारे 4.45 वाजता घडली. या प्रकरणी तुळींज पोलिसांनी 16 वर्षीय अल्पवयीन चालकाला ताब्यात घेतले आहे. तसेच अल्पवयीन मुलाला कार चालवण्याची परवानगी दिल्याचा आरोप असलेल्या वाहनमालकासह आणखी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : मुंबई : नजर काढण्याच्या बहाण्याने घरात शिरला, बहुरुपी तृतीयपंथीयाचा महिलेवर लैंगिक अत्याचार
कारने दोघींना चिरडलं, एका महिलेचा मृत्यू
मृत महिलेचे नाव श्रेया मिसाळ (वय 32) असून जखमी महिलेचे नाव प्रगती मोरे (36) आहे. दोघीही नालासोपारा पूर्वेतील नागिंदास पाडा परिसरातील रहिवासी असून घरकाम करत होत्या. बुधवारी सकाळी त्या कामासाठी वसई येथे गेल्या होत्या. काम आटोपून नालासोपारा रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर त्या दोघी घरी जाण्यासाठी दत्तनगर परिसरातून पायी जात होत्या. त्याचवेळी भरधाव वेगाने येणाऱ्या राखाडी रंगाच्या मारुती ईको कारने त्यांना धडक दिली. या धडकेत दोघींनाही दुखापत झाली.
हेही वाचा : मुंबई : नजर काढण्याच्या बहाण्याने घरात शिरला, बहुरुपी तृतीयपंथीयाचा महिलेवर लैंगिक अत्याचार
