मुंबई : सासूने घरगड्यालाच दिली सुनेची सुपारी, क्रूर हत्याकांडाचा कसा झाला उलगडा?
मुंबईतील एका महिलेची कथितरीत्या हत्या करण्यात आली; यासाठी तिच्या सासूने एका माजी घरगड्याच्या कुटुंबाला 3 लाख रुपये दिले होते. पोलिसांना शरीरावर गंभीर जखमांच्या खुणा आढळल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबई : सासूने घरगड्यालाच दिली सुनेची सुपारी
क्रूर हत्याकांडाचा कसा झाला उलगडा?
Mumbai Crime : सासू आणि सुनेचा वाद ही जवळपास प्रत्येक घरातील गोष्ट. मात्र मुंबईतील एका घरातील हा वाद जीवघेणा झाला आहे. मुंबईतील एका 35 वर्षीय महिलेची तिच्या सासूने सुपारी देऊन हत्या केली. सपना गंगी असं मृत महिलेचं नाव आहे. 16 ऑगस्टच्या रात्री ही घटना घडली असून, सुरुवातीला सासू धनलक्ष्मी गंगी (60) यांनी वादावादीनंतर सपना बाथरूममध्ये पडून गंभीर जखमी झाल्याचा बनाव पोलिसांसमोर रचला होता.
सासूने दिली तीन लाखांची सुपारी
17 ऑगस्ट रोजी पंतनगर पोलिसांना रुग्णालयाकडून उपचारादरम्यान सपना यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. मात्र, मृतदेहाची पाहणी करताना डॉक्टरांना मान आणि डोक्यावर संशयास्पद खुणा आढळल्याने या प्रकरणातील गूढ वाढले. यानंतर तपासात सासूने 3 लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
हे ही वाचा : हिंगोली : बिस्किस्टाचे अमिष दाखवून 13 वर्षीय भोळसर मुलीवर सामुहिक बलात्कार, चौघांना अटक
परदेशातून सुट्ट्या घालवण्यासाठी आली अन्...
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी, तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजची कसून चौकशी केली असता, हा अपघात नसून पूर्व नियोजित खून असल्याचे समोर आले. कौटुंबिक वादातून ही हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. सपना यांनी 2024 मध्ये सासरच्या लोकांविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता, ज्याचा सासू धनलक्ष्मी यांच्या मनात राग होता. सपना आपल्या मुलासह जून 2026 मध्ये दुबईहून मुंबईत सुट्ट्या घालवण्यासाठी आल्या होत्या. याच संधीचा फायदा घेऊन सासूने त्यांना कायमचे संपवण्याचा कट रचला.
हे ही वाचा : शाळेच्या पाहाणीसाठी गेलेल्या CJP च्या कार्यकर्त्यांना मारहाण, शाळेच्या बाहेर मोठा राडा
कुणाला दिली सुपारी?
हत्येचा कट अमलात आणण्यासाठी धनलक्ष्मी यांनी आपल्या माजी घरकामगार मंगला जाधव आणि तिच्या कुटुंबाला 3 लाख रुपयांची सुपारी दिली होती. 16 ऑगस्ट रोजी सपना घरात एकट्या असताना मंगला, तिचा पती सुरेश, मुलगी शिवानी आणि मुलगा साजन यांनी टप्प्याटप्प्याने घरात प्रवेश केला. त्यांनी सपना यांच्या डोक्यात काचेचा ग्लास मारला, डोळ्यांत तिखट फेकले आणि कपड्याच्या साहाय्याने त्यांचा गळा आवळला. श्वास थांबल्यानंतरही सुरेश आणि साजनने सपना यांच्या मानेवर पाय देऊन त्यांचा मृत्यू झाल्याची खात्री केली आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
