19 वर्षीय तरुणीवर घराच्या दारासमोरच अंत्यसंस्कार, प्रेमविवाहानंतर वाट्याला आला अपमान; काय घडलं?

एका 19 वर्षीय तरुणीला प्रेमविवाहाची किंमत मृत्यूने चुकवावी लागली आहे. यानंतर न्यायाची मागणी करत तिच्या माहरेकडील लोकांनी तिच्या सासरच्या घराबाहेरच तिच्यावर अंत्यसंस्कार केले.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

प्रेमविवाहानंतर 19 वर्षीय तरुणीचा छळ

point

सासरच्या घराच्या दारातच अंत्यसंस्कार

point

माहेरच्या लोकांनी असं का केलं?

Crime News  : 19 वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. गुंजा कुमारी असं 19 वर्षीय मृत तरुणीचं नाव आहे. याच वर्षी 23 जानेवारी रोजी कुंदन कुमार याच्याशी तिचा प्रेमविवाह झाला होता. लग्नाला एक वर्षही पूर्ण झाले नसताना, हुंड्यावरून तिचा छळ केला जात असल्याचा गंभीर आरोप माहेरच्या लोकांनी केला आहे. बिहारच्या मुझफ्फरपूर परिसरातील ही घटना आहे.

मृतदेह सोडून माहेरचे लोक फरार

15 ऑक्टोबरच्या रात्री बारा वाजण्याच्या सुमारास स्थानिक वार्ड सदस्याकडून गुंजाच्या मृत्यूप्रकरणी माहिती मिळताच माहेरचे नातेवाईक तातडीने सासरच्या घरी पोहोचले. सासरचे लोक कुठलीही कल्पना न देता गुंजाचा मृतदेह परस्पर जाळण्याच्या तयारीत होते आणि माहेरचे लोक पोहोचताच ते घर सोडून पळून गेले. मृत गुंजाच्या गळ्यावर खोल जखमेचे निशाण असल्याने तिच्या मृत्यूबाबत गंभीर संशय व्यक्त केला जात आहे.

हे ही वाचा : गडचिरोली : कंत्राटदाराकडून लाच घेताना रंगेहात पकडलं, भाजपचा नगरसेवक ACB च्या जाळ्यात

दारातच अंत्यसंस्कार

घटनेची माहिती मिळताच मुशहरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि श्री कृष्ण मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवला. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर माहेरच्या लोकांनी न्यायाच्या मागणीसाठी मृतदेह थेट सासरच्या घराच्या मुख्य दारासमोरच अंत्यसंस्कार केला. गुंजाच्या वडिलांच्या तक्रारीवरून पती कुंदन कुमार, सासरचा भाऊ चंदन, बहीण प्रियंका आणि भावजय सुलेखा यांच्याविरुद्ध हुंडा हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा : मुंबईत 12 वर्षीय मुलीने 2 वर्षाच्या मुलीला सहाव्या मजल्यावरून ढकललं, आरोपीच्या आईनं..

मृत्यू नेमका कसा झाला?

या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता फॉरेन्सिक सायन्स टीमने (FSL) घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा केले आहेत. गुंजाचा मृत्यू नेमका कसा झाला, ही हत्या होती की आत्महत्या, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.पोलीस सध्या शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत असून सर्व आरोपींच्या अटकेसाठी कसून शोध घेत आहेत.