गडचिरोली : कंत्राटदाराकडून लाच घेताना रंगेहात पकडलं, भाजपचा नगरसेवक ACB च्या जाळ्यात

भाजपच्या स्वीकृत नगरसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहात पकडले. अमोल गुडेल्लीवार (वय 47) असे या लाचखोर स्वीकृत नगरसेवकाचे नाव आहे.

ADVERTISEMENT

Gadchiroli BJP Corporator Arrested
Gadchiroli BJP Corporator Arrested
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

भाजपचा नगरसेवक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

point

1 लाख 20 हजारांची लाच घेताना अटक

Gadchiroli BJP Corporator Arrested, व्येंकटेश दुडमवार : नगर पंचायतींतर्गत मिळालेल्या विद्युतविषयक कामाचे कमिशन म्हणून कंत्राटदाराकडून 1 लाख 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना भाजपच्या स्वीकृत नगरसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. अमोल गुडेल्लीवार (वय 47) असे या लाचखोर स्वीकृत नगरसेवकाचे नाव आहे. ही कारवाई 15 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास अहेरी येथील मुख्य बाजारपेठेत करण्यात आली.

काम मिळवून देण्याचा मोबदला

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार कंत्राटदाराला अहेरी नगर पंचायतीकडून विद्युत कामाचे कंत्राट मिळाले होते. हे काम मिळवून दिल्याचा मोबदला आणि कमिशन म्हणून नगरसेवक अमोल गुडेल्लीवार याने तक्रारदाराकडे 1 लाख 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. परंतु, लाच देण्याची अजिबात इच्छा नसल्याने कंत्राटदाराने याप्रकरणी गोंदिया येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे थेट तक्रार नोंदवली.

हे ही वाचा : Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात कुठे पाऊस, कुठे उकाडा? पाहा कसं आहे आजचं हवामान

कसं घेतलं ताब्यात?

कंत्राटदाराच्या तक्रारीनंतर एसीबीच्या पथकाने लाचेच्या मागणीची तात्काळ पडताळणी केली आणि अहेरीतील मुख्य बाजारपेठेत सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून 1 लाख 20 हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या अधिकाऱ्यांनी गुडेल्लीवार यास रंगेहाथ ताब्यात घेतले. 

हे ही वाचा : निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाचा इशारा! 'फालतू बहाणे नको' पुरावे गायब कसे झाले?

गडचिरोली जिल्ह्यात खळबळ

या कारवाईनंतर अमोल गुडेल्लीवार याच्याविरोधात अहेरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकप्रतिनिधीनेच अशा प्रकारे लाच मागितल्याचे उघडकीस आल्याने अहेरीसह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.