नाशिक : रस्ता आहे की घसरगुंडी? प्रवास करणे जीवघेणे, VIDEO पाहाच
Nashik Trimbakeshwar Road : नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर रस्त्यावरील चिखलामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर सुमारे 50 ते 60 वाहनचालक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नाशिक : रस्ता आहे की घसरगुंडी?
प्रवास करणे जीवघेणे, VIDEO पाहाच
Nashik Trimbakeshwar Road : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडच्या विकासाचे काम सुरू आहे. मात्र, या कामादरम्यान सिमेंटचा थर टाकल्यानंतर रस्त्याची स्वच्छता आणि देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. श्रावण मास आणि सुट्ट्यांमुळे या मार्गावर भाविकांची मोठी गर्दी होत असताना रस्त्यावर साचलेल्या चिखलामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
हेही वाचा : 'मांसाहारींना घर नाही, शाकाहारींचे स्वागत', जाहिरातीवरून अमित ठाकरेंनी ब्रोकरची केली कानउघडणी
वाहनचालकांसाठी हा मार्ग घसरगुंडीप्रमाणे झाल्याचे चित्र
रस्त्यावर साचलेल्या चिखलामुळे वाहनचालकांसाठी हा मार्ग घसरगुंडीप्रमाणे झाल्याचे चित्र दिसत आहे. या परिस्थितीत अनेक वाहनचालकांना अपघातांचा सामना करावा लागला असून, सुमारे 50 ते 60 वाहनचालक जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे विकासकाम सुरू असलेल्या या मार्गावर रस्त्याची स्वच्छता आणि देखभाल याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
हेही वाचा : 'मांसाहारींना घर नाही, शाकाहारींचे स्वागत', जाहिरातीवरून अमित ठाकरेंनी ब्रोकरची केली कानउघडणी
