अपहरण करुन सामूहिक बलात्कार, दोन मुलांच्या आईसोबत घडलं भयंकर

मुंबई तक

आपल्या माहेरी आलेल्या एका विवाहित महिलेला घरातून बळजबरीने पळवून नेण्यात आले. आरोपींनी तिला गुंगीचे इंजेक्शन देऊन आधी तिचे अपहरण केले, त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

अपहरण करुन सामूहिक बलात्कार

point

दोन मुलांच्या आईसोबत घडलं भयंकर

Crime News : राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. आपल्या माहेरी आलेल्या एका विवाहित महिलेला घरातून बळजबरीने पळवून नेण्यात आले. आरोपींनी तिला गुंगीचे इंजेक्शन देऊन आधी तिचे अपहरण केले, त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिला एका पाणी नसलेल्या विहिरीत फेकून दिले. या अत्यंत गंभीर प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नशेचे इंजेक्शन दिले अन्...

मिळालेल्या माहितीनुसार, ही अंगावर काटा आणणारी घटना 3 जुलैच्या रात्री वाजेच्या सुमारास घडली. पीडित महिला आपल्या माहेरी होती आणि घरात तिचे वडीलही उपस्थित होते. रात्रीच्या वेळी तीन तरुण दुचाकीवरून तिच्या घराजवळ आले आणि त्यांनी दरवाजा ठोठावला. आवाज ऐकून महिला दरवाजा उघडण्यासाठी बाहेर आली असता, दुचाकीवरून उतरलेल्या दोन तरुणांनी तिला बळजबरीने सोबत नेण्याचा प्रयत्न केला. महिलेने याला तीव्र विरोध केला, मात्र नराधम आरोपींनी तिला नशेचे इंजेक्शन टोचले. यामुळे महिला जागीच बेशुद्ध झाली आणि आरोपी तिला दुचाकीवर टाकून घेऊन गेले.

हे ही वाचा : वर्गमित्राकडून अनन्वित छळ करुन हत्या, मेडिकलच्या विद्यार्थीनीसोबत काय घडलं?

सामूहिक बलात्कार करुन विहिरीत फेकले

नशेत धुंद असलेल्या या महिलेवर आरोपींनी सामूहिक अत्याचार केला आणि त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तिला जवळच असलेल्या एका सुक्या विहिरीत फेकून देऊन तेथून पळ काढला. तब्बल चार दिवसांनंतर, म्हणजेच 7 जुलै रोजी महिलेला थोडी शुद्ध आली तेव्हा तिने विहिरीतून मदतीसाठी आवाज दिला. सुदैवाने त्या भागातून जाणाऱ्या एका पादचाऱ्याला तिचा आवाज ऐकू आला आणि त्याने तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गावकऱ्यांच्या मदतीने महिलेला सुखरूप बाहेर काढले. त्यावेळीही तिची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने तिला तातडीने अलवर येथील राजीव गांधी सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले.

हे ही वाचा : घरात घुसून एक्स गर्लफ्रेंडवर वार, नंतर स्वत:चा चिरला गळा, ड्रायव्हर का झाला क्रूर?

दोन मुलांची आई

उपचारादरम्यान महिला पूर्णपणे शुद्धीवर आल्यानंतर तिने आपल्यासोबत घडलेला हा भयानक प्रसंग कुटुंबीय आणि पोलिसांना सांगितला. पीडित महिला विवाहित असून तिला दोन मुले आहेत आणि ती गेल्या महिनाभरापासून माहेरी राहत होती. ती 3 जुलैच्या रात्रीपासून बेपत्ता असल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेऊन दुसऱ्याच दिवशी पोलिसांत ती बेपत्ता झाल्याची तक्रारही नोंदवली होती. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे नसवारी गावचे रहिवासी आहेत. सध्या पोलीस पीडितेच्या आणि स्थानिक नागरिकांच्या जबाबाच्या आधारे आरोपींचा माग काढत असून, या प्रकरणाचा अत्यंत गांभीर्याने तपास केला जात आहे.

हे वाचलं का?