78 वर्षीय वृद्ध महिला गाढ झोपली, लेकानेच लाठीकाठीने मारहाण करत आईला संपवलं

मुंबई तक

Crime News : तरुणाने आपल्या 78 वर्षीय वृद्ध आईची हत्या केली, नंतर तिला लाठीने मारहाण केली. महिला मध्यरात्री गाढ झोपली असताना ही दुर्दैवी प्रकार घडला होता. आईवर झालेल्या या जीवघेण्या हल्ल्याने महिलेचा झोपेतच मृत्यू झाला.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

78 वर्षीय वृद्ध महिलेची मुलाकडून हत्या

point

रामनिवास विरोधात हत्येचा गुन्हा दाखल

Crime News : राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यातील श्रीडूंगरगढ़ येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका मुलाने आपल्या 78 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या केली, नंतर तिला लाठीने मारहाण केली. महिला मध्यरात्री गाढ झोपली असताना ही दुर्दैवी प्रकार घडला होता. आईवर झालेल्या या जीवघेण्या हल्ल्याने महिलेचा झोपेतच मृत्यू झाला. हत्या करणारा हा मृत महिलेचा मुलगा असून त्याची ओळख रामनिवास अशी समोर आली. 

हे ही  वाचा : बाईक चोरीचा संशय, तरुणाला विजेचा शॉक; Video व्हायरल

तरुणावर मानसोपचार रुग्णालयात उपचार सुरू 

श्रीडूंगरगढ़ पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपींनी कारवाई करत आरोपी मुलगा रामनिवासला ताब्यात घेतले. मृत महिलेच्या कुटुंबीय आणि अन्य सदस्यांच्यानुसार, आरोपी रामनिवासला अटक केली. आरोपी रामनिवास हा मागील काही महिन्यांपासून मानसिक त्रास सहन करतोय.  त्याच्यावर मानसोपचार रुग्णालयात उपचार देखील सुरू आहेत. 

रामनिवास विरोधात हत्येचा गुन्हा दाखल

मृत महिलेच्या दुसऱ्या मुलाने आई गीता देवीच्या मृत्यूनंतर पोलीस ठाण्यात रामनिवास विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी ओमप्रकाशच्या लिखित अहवालाच्या आधारावर बीएनएस अंतर्गत कलमांन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हे ही  वाचा : बाप लेकीच्या नात्याला काळिमा! वडिलांचा मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडितेनं पेट्रोल टाकून घेतलं पेटवून

संबंधित प्रकरणात परिस्थिती पाहता, बीकानेरहून एफएसएल आणि एमओयूच्या विशेषज्ञ पथकाना घटनास्थळी बोलावले. संबंधित पथकाने घटनास्थळावर येऊन तपास केला. अशातच पोलिसांनी मृत व्यक्ती गीता देवीचा मृतदेह श्रीडूंगरगढ़ येथील रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. अशातच डॉक्टरांच्या वैद्यकीय मंडळाने शवविच्छेदन करून मृतदेह अंत्यसंस्कारासाठछी कुटुंबीयांच्या ताब्यात दिला होता. या घटनेमागील खरा हेतून उघडकीस आणण्यासाठी पोलिसांनी कोठडीतील आरोपीची कसून चौकशी केली. 

हे वाचलं का?